Tasgaon: तासगाव बसस्थानकातून २ लाखांचे दागिने चोरले; गर्दीचा घेतला फायदा, पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Sangli News : फिर्यादी यांनी त्यांचे सोन्याचे दागिने एका स्टीलच्या डब्यात काढून त्यांच्याकडील पर्समध्ये ठेवले होते. दरम्यान, तासगाव-जरंडी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांची पर्स लंपास केली.
Gold jewellery worth ₹2 lakh stolen at Tasgaon ST stand; crowd used as cover for theft.
Gold jewellery worth ₹2 lakh stolen at Tasgaon ST stand; crowd used as cover for theft.Sakal
Updated on

तासगाव : येथील बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढत असलेल्या एका महिलेचे दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. छाया शिवाजी पाटील (अंजनी, ता. तासगाव) यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. गेल्या पंधरा दिवसात तासगाव बसस्थानकावरून दागिने लंपास करण्याची ही दुसरी मोठी घटना आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com