पाटण तालुक्यात चोरट्यांनी फाेडली सात दुकाने

पाटण तालुक्यात चोरट्यांनी फाेडली सात दुकाने

ढेबेवाडी (जिल्हा सातारा) :  ढेबेवाडी (ता. पाटण) येथे काल रात्री चोरट्यानी अक्षरशः धुमाकूळ घातला. बसस्थानक चौकानजीकच्या व्यापारी संकुलातील तब्बल सात दुकाने  फोडून चोरट्यानी रोकड व अन्य  साहित्य मोठ्या प्रमाणात लंपास केले आहे.

संबधित दुकानदार आणि पोलिसांना याबाबत कळविल्यानंतर तेही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.चोरट्यानी कटावणीच्या साह्याने दुकानांची शटर्स तोडून आत प्रवेश केला आणि ड्राव्हरमधील पैसे,किमती वस्तू आणि खाद्यपदार्थ चोरून नेल्याचे व्यवसायिकांनी सांगितले.

हेही वाचा -  व्‍वा... शेखर सिंहांचा पहिल्‍याच दिवशी धडाका

पंचनाम्यानंतरच त्याचा नेमका तपशील समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.या   घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण असून पोलिसांनी आवश्यक उपाययोजना हाती घेण्याबरोबरच चोरट्यांचा छडा लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

बनावट कर्ज प्रकरणांद्वारे फसवणारी टोळी अटकेत 

सातारा : कर्जदारांच्या कर्ज प्रकरणातील कागदपत्रांचा परस्पर गैरवापर आणि त्यांच्या बनावट सह्या करून, मोबाईल खरेदीसाठी बजाज फायनान्समधून कर्ज उचलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश शाहूपुरी पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक झाली असून, एक जण फरारी आहे. 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सुनयन सुमंत शुक्‍ल (वय 31, रा. बोरगाव, ता. सातारा, मूळ रा. कौलखेड, जि. अकोला) हा कर्ज प्रकरणे करणारा एजंट आहे. मागील दोन महिन्यांमध्ये त्याने गुन्ह्यातील फिर्यादी अमीर फिरोज मुल्ला (रा. गोंदवले, ता. माण) यांच्या आईचे कर्ज प्रकरणातील कागदपत्रांचा त्यांच्या परस्पर गैरवापर करून व त्यांची बनावट खोटी सही करून त्याद्वारे त्यांच्या नावावर मोबाईल खरेदीसाठी बजाज फायनान्समधून कर्ज प्रकरण मंजूर करून घेतले. 36 हजार 990 रुपये किमतीचा मोबाईल खरेदी करून त्यांची फसवणूक केल्याबाबतची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.
 
सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व पथकाने गुन्ह्यांचा तपास केला. त्यात मुख्य संशयित सुनयन शुक्‍ल याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता, अजूनही तीन साथीदारांचा यामध्ये सहभाग असल्याची माहिती समोर आली. बजाज फायनान्सचे सेल्स एक्‍झिक्‍युटिव्ह प्रफुल्ल प्रकाश बुरुंगे (वय 24, रा. मालखेड, पो. बेलबडे, ता. कऱ्हाड), गौतम मोहन तोरणे (वय 29, रा. प्लॉट नं. 11 त्रिमूर्ती कॉलनी, गोडोली) या दोघांनी मदत केली आहे. सुनयन शुक्‍ल याच्याकडून आतिक अफजल शेख (वय 34, रा. गुरुवार पेठ, एलबीएस कॉलेजसमोर) याने मोबाइल विकत घेतला आहे. यातील गौतम तोरणे अद्याप फरारी आहे.
 
नक्की वाचा - सागरिका कॅंटीनचा प्रयोग राज्यभर राबवू : मंत्री देसाई


संबंधितांच्या बॅंक खात्यातून पैसे कमी झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. श्री. शेख, श्री. वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल हसन तडवी, हिम्मत दबडे-पाटील, नाईक शैलेश फडतरे, अमित माने, कॉन्स्टेबल स्वप्नील कुंभार, मोहन पवार, पंकज मोहिते यांनी या टोळीचा पर्दाफाश केला. 

चार लाखांची फसवणूक 

बनावट कागदपत्रांद्वारे अद्यापपर्यंत आठ जणांची चार लाख 32 हजार 950 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन शाहूपुरी पोलिसांनी केले आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com