चोरीचा 24 तासात छडा; 32 तोळे सोने, 32 हजार परत 

शिवाजी चौगुले
Saturday, 26 December 2020

मांगले (ता. शिराळा) येथील चोरीतील बत्तीस तोळे सोने आणि बत्तीस हजार रोख रक्कम उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे आणि शिराळाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी डॉ. बाळासो पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. 

शिराळा : मांगले (ता. शिराळा) येथील चोरीतील बत्तीस तोळे सोने आणि बत्तीस हजार रोख रक्कम उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे आणि शिराळाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी डॉ. बाळासो पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. 

मांगलेतील डॉ. बाबासो पाटील कुटुंबासह नातेवाईकांकडे गेले असताना 21 ते 25 नोव्हेंबर दरम्यान चोरी झाली होती. ते घरी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्याने घरातील चांदी, सोने, देवाची भांडी असे 32 तोळे सोने आणि रोख रक्कम लांबवली होती. 

पोलिसांनी या चोरीचा छडा अवघ्या चोवीस तासात लावला. संशयित राहुल देवकर व रोहित देवकर यांनी घरफोडी केल्याचे कबुल केले होते. त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल व रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली होती. या चोरीतील मुद्देमाल 32 तोळे सोने, चांदी आणि रोख रक्कम 32000 आज डॉ. पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft within 24 hours; 32 ounces of gold, 32 thousand back