esakal | धडपड अंधांना विज्ञान दृष्टी देण्याची ....

बोलून बातमी शोधा

They are working to give blind vision to science...

अंधानी दृष्टी हरवलेली असते. मात्र त्यांना विज्ञान दृष्टी देता येते. त्यासाठी अंधश्रध्दा निर्मुलन समितीने अंध शाळांसाठी विज्ञान असा विशेष उपक्रमच सुरु केला आहे.

धडपड अंधांना विज्ञान दृष्टी देण्याची ....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : अंधानी दृष्टी हरवलेली असते. मात्र त्यांना विज्ञान दृष्टी देता येते. त्यासाठी अंधश्रध्दा निर्मुलन समितीने अंध शाळांसाठी विज्ञान असा विशेष उपक्रमच सुरु केला आहे. विज्ञान दिनाच्या निमित्ताने त्यांनी सुरु केलेल्या या उपक्रमांतर्गत कोल्हापूरच्या अंधशाळेत विज्ञानाचे मुलतत्व समजून सांगणारे काही प्रयोग आणि उपक्रमाचे सादरीकरणही झाले.

आपण विज्ञानाची सृष्टी घेतली मात्र विज्ञानाची दृष्टी नाही घेतली नाही. त्यामुळेच समाजात अद्यापही पुराणाचे, तर कधी कुठल्या तरी ग्रंथांचे... कधी पौराणिक कथांचे तर कधी सांगोपसांगी प्रचलित लोक कथांचे दाखले देवून विज्ञानावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. खरंतर आर्यभट्ट, कणाद ऋषी अशी खगोल विज्ञानाची समृद्ध परंपरा असणाऱ्या आपल्या देशाचे त्या अभ्यासातील प्रभुत्व जगाने मान्य केले होते. परंतु त्याचवेळी समाजाने ते मान्य ना केल्यामुळे त्यांना मात्र बहिष्कृत आयुष्य जगावे

लागले. एक समृद्ध परंपरा लोक मान्यतेच्या अभावामुळे हळूहळू लोप पावली. पुढे मग त्याची जागा फल ज्योतिषाने घेतली. त्याच्याशी सांगड घालून आले ते कोट्यावधी किलोमीटर अंतर असलेल्या ग्रहांना शांत करणारे... आणि त्यावर उपाय सांगणारे, त्यातून आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण करणारे चमत्कारी बाबा आणि त्यांचे चमत्कार..... हेच चमत्कार डोळस व्यक्तींना भुरळ घालतात. जिथे डोळस माणसंच अशा अंधश्रध्दांच्या आहारी जातात तिथं अंधांनी मात्र या विज्ञानाचा क कारण भाव समजून घेण्याची इच्छा दाखवली. 

अंधशाळेचे शिक्षक सचिन नवले यांनी अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी....काहीसे भौतिक शास्त्र, काही पदार्थांचे रासायनिक गुणधर्म याविषयी कसं समजून सांगायचं अशी विचारणा केली. समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा.प. रा. आर्डे यांच्यासडॉ. सविता अक्कोळे, आशा धनाले, त्रिशला शहा यांनी पुढाकार घेत अंधांसाठी विज्ञान समजून सांगणारी काही उपकरणे तयार केली. त्यात गुरुत्वाकर्षण, ध्वनी, पदार्थावरी दाब या संकल्पना समजून सांगण्यासाठी साधने तयार केली. दोन तासाच्या या कार्यशाळेदरम्यान मुलांचे उजळलेले चेहरे नवी दृष्टी देणारी होती. अंध विद्यार्थ्यांच्या अध्यापनात कोणते बदल आणले पाहिजेत याचा धडा देणारी ही कार्यशाळा ठरली. 

भविष्यात अंधशाळासाठीचे मॉडेल ठरेल

ही मुले नेत्रहिन आहेत... मात्र दृष्टिहीन निश्‍चितच नाहीत. याचाच आम्हाल प्रत्यय आला. या मुलांसाठी आम्ही विशेष विज्ञान प्रयोग शाळा सुरु करणार आहोत. भविष्यात सर्वच अंधशाळासाठीचे ते मॉडेल ठरेल. समाजाने यासाठी मदत द्यावी.
- प्रा.प.रा.आर्डे, अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते