निष्ठा, तत्त्वांच्या गोष्टी त्यांनी बोलू नये 

They should not talk about loyalty, principles
They should not talk about loyalty, principles

संगमनेर : ""मागील साडेचार वर्षांत विखेंनी बजावलेली तथाकथित विरोधी पक्षनेत्याची भूमिका अवघ्या महाराष्ट्राने चांगलीच अनुभवली. कॉंग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक राहून, निष्ठा व तत्त्वांशी तडजोड न करणाऱ्यांना त्यांनी हे सांगू नये. स्वतः पक्षबदलात निष्णात असलेल्या विखेंच्या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची आवश्‍यकता नाही,'' असा टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला. 

थोरात म्हणाले, ""विखेंची कार्यपद्धती राज्यात सर्वांना माहिती आहे. सत्तेसाठी पक्षबदल करूनही हाती काहीच न लागल्याने ते काहीही बोलतील. त्याला मीच काय, कोणीही महत्त्व देत नाही. ज्या पक्षाने मोठे केले, त्या कॉंग्रेस पक्षासोबत आपण अडचणीच्या काळातही ठाम भूमिका घेऊन एकनिष्ठ राहिलो. पुढील काळातही आपली हीच भूमिका कायम राहील.'' 

""या उलट, मागील साडेचार वर्षांत कॉंग्रेस पक्षाने त्यांना विरोधी पक्षनेतेपदासह अनेक पदे दिली. त्यांनी पक्षवाढीसाठी केलेले काम जनतेसमोर आहे. ते जेथे गेले, तेथे अल्पावधीत मित्र वाढविले. ही त्यांची जुनीच कार्यपद्धती आहे. त्यांना फार महत्त्व देऊन याविषयी जास्त वक्तव्य करण्याचीही आवश्‍यकता नाही. अनेक वावटळींतही कॉंग्रेस पक्षाचा देशाच्या विकासाचा शाश्वत विचार कायम टिकला आहे. शेतकरी व सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आहे. कर्जमाफीच्या निर्णयामध्ये कोणत्याही किचकट अटी नाहीत. सरसकट दोन लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. नियमित कर्जफेड करणारे व दोन लाखांपुढील कर्जदार शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत हे सरकार काम करीत आहे,'' असे ते म्हणाले. 

महाविकास आघाडीचाच अध्यक्ष 
राज्यात जिल्हा परिषदांसाठी महाविकास आघाडी एकत्र काम करणार आहे. नगर जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचाच अध्यक्ष होईल, असा विश्‍वासही थोरात यांनी या वेळी व्यक्त केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com