त्यांनी यु-ट्यूब वरून घेतले चोरीचे प्रशिक्षण, आणि काय केले वाचा

they took theft training from YouTube, and what they did
they took theft training from YouTube, and what they did
Updated on

कुरळप (जि . सांगली) ः चैनीसाठी दुचाकी चोरून, ती आपलीच आहे असे भासवून पै पाहुण्यांसह पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या दोघा अल्पवयीन चोरट्यांना कुरळप पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे एक लाख रुपये किमतीची दुचाकी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी विकास आनंदराव शिंदे (रा. कणेगाव) यांनी कुरळप पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कणेगाव येथून एका पोलिस अधिकाऱ्याची एक दुचाकी तीन दिवसांपूर्वी चोरीस गेली होती. या तक्रारीवरून कोल्हापूर जिल्ह्यातील मंगराईवाडी येथील या दोघा अल्पवयीन चोरट्यांना कुरळप पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यावेळी त्यांनी कणेगाव येथील नवीन वसाहत येथून दुचाकी (एमएच 09, ईएफ 5333) चैनीसाठी चोरल्याचे कबूल केले. चोरलेली दुचाकी घेऊन त्यांनी बहिणीकडे, मामाकडे जाऊन मुक्काम करून ती आपलीच असल्याचे सांगून तीन दिवस सर्वांचीच दिशाभूल केली.

मात्र पोलिस नाईक भूषण महाडिक व हवलदार अनिल पाटील यांनी या अल्पवयीन चोरट्यांचा तपास करीत दोघांना सोनी भोसे येथून मामाच्या घरातून ताब्यात घेतले. गाडी चोरीचे प्रशिक्षण युट्युब वरून घेतल्याचे त्या चोरट्यांनी सांगितले. ही चोरी करण्यासाठी त्यांनी अन्य एक दुचाकी वापरली होती. ती ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli DCC Bank recruitment latest update
Maharashtra pomegranate price latest update
Sangli farmers oppose Shaktipeeth Expressway
When will Sangli DCC Bank recruitment restart?
Marathi News Esakal
www.esakal.com