
नगर : शहरातील औरंगाबाद रस्त्यालगत असणाऱ्या अकबरनगर येथे एका प्रार्थनास्थळात पोलिसांना 13 परप्रांतीय नागरिक आढळून आले.
अकबरनगरमधील एका प्रार्थनास्थळात काही लोक वास्तव्यास असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार आज दुपारी पोलिसांनी अकबरनगरमधील प्रार्थनास्थळावर छापा घातला असता, तेथे 13 परप्रांतीय आढळून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याबाबत रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
हेही वाचा - रोज मटण-दारूची पार्टी पुण्या-मुंबईवाल्यांना आवरा
नगरमध्ये कोरोना पेशंटचा आकडा सव्वीसवर गेल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पहिल्या तीन पेशंटमध्ये दुबईहून आलेल्यांचा समावेश होता. त्यातील एकास संपर्कात आल्याने बाधा झाली होती. मात्र, नंतर जे पेशंट सापडले आहेत ते सर्व तबलिगी जमातच्या कार्यक्रमाशी निगडित आहेत.
जामखेडमधील मशिदीत काही परदेशी नागरिक लपून बसल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यामुळे त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली असता आयव्हरी कोस्ट आणि फ्रान्समधील नागरिक वास्तव्यास असल्याचे दिसले. त्यांची तपासणी केली असता त्यातील तिघेही बाधित असल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने काळजी घेतली. त्यानंतर स्वतःहून तबलिक जमातच्या कार्यक्रमाशी जे निगडित आहेत त्यांनी स्वतःहून पुढे येण्याचे आवाहन केले. मात्र, फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.
संचारबंदी असतानाही काही लोक प्रार्थनास्थळात लपून राहत आहेत. त्यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. यासाठीच प्रशासनाकडून सर्च मोहीम राबवली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.