आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होणार महापूराचा सखोल अभ्यास

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होणार महापूराचा सखोल अभ्यास

सांगली - कृष्णा व भिमा खोऱ्यातील अभुतपूर्व जलप्रलयाच्या अभ्यासासाठी राज्य शासनाने जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नियुक्त केली आहे. ही समिती भिमा व कृष्णा खोऱ्यात निर्माण झालेल्या पूर परस्थितीचा आधुनिक तंत्राद्वारे सखोल अभ्यास करणार आहे. ही दहा सदस्यीय समिती तीन महिन्यात अहवाल देणार आहे. 

समितीकडून होणार याचा अभ्यास - 

  • कर्नाटकातील अलमट्टी व इतर धरणांच्या जलाशयामुळे (बॅक वॉटर) पूर परस्थिती निर्माण होते का याचा स्वयंस्पष्ट अहवाल ही समिती करणार सादर. 
  • भविष्यात अशी स्थिती निर्माण होऊ नये तसेच याची दाहकता कमी व्हावी याकरिता सर्वंकष ठोस उपाययोजना ही समिती सुचविणार. 
  • धोरणात्मक उपाययोजनांबरोबरच धरणातील सुधारित जलाशय व्यवस्थापन व नियंत्रण, आपत्कालीन कृती आराखडा, पूरप्रवण क्षेत्रातील बांधकामे नियंत्रण अशा सुक्ष्म बाबींबाबतही ही समिती करणार सुचना 
  • सुधारित तांत्रिक आकडेवारीसह अहवाल व शिफारसी करणार ही समिती. 

समितीने पहिल्या बैठकीत अहवाल सादर करण्याचा कालावधी ठरवावा. जास्तीत तीन महिन्यात म्हणजे 30 नोव्हेंबरपर्यंत अहवाल द्यावा. समितीला वाटेल अशा केंद्र व राज्यातील अधिकाऱ्यांना तसेच अन्य स्वयंसेवी संस्था व व्यक्तींचा आवश्‍यकतेप्रमाणे विशेष निमंत्रित मान्यता देण्याचा अधिकार समिती अध्यक्षांना दिला आहे. 

समितीचे अन्य सदस्य असे

विनय कुलकर्णी, तांत्रिक सदस्य, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, संजय घाणेकर, सचिव प्रकल्प समन्वयक, जलसंपदा विभाग, प्रा. रवी सिन्हा (आय. आय. टी. मुंबई), नित्यानंद रॉय (मख्य अभियंता, केंद्रीय जल आयोग, नवी दिल्ली) संचालक, महाराष्ट्र सुदूर संवेदना उपयोजिता केंद्र, नागपूर, उप महासंचालक, भारतीय हवामान विभाग, संचालक, आय.आय.टी मुंबई, प्रदिप पुरंदरे (सामाजिक कार्यकर्ते व तज्ज्ञ), राजेंद्र पवार (सचिव, जलसंपदा विभाग, मुंबई) 

"" समिती सदस्यांची पहिली बैठक येत्या 27 ऑगस्टला मुंबईत होणार आहे. यापुर्वी मी जलसंपदा विभागाच्यावतीने 2009 मध्ये शासनाला अहवाल दिला होता. आता अनेक तज्ज्ञांच्या सहकार्याने आम्ही परिपूर्ण असा अहवाल सादर करु. त्यासाठी मी या क्षेत्रातील सर्व तज्ज्ञांशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहे.'' 
-  नंदकुमार वडनेरे,
 अध्यक्ष 
कृष्णा भिमा खोरे पूर परिस्थिती अभ्यास समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com