esakal | "त्या' 19 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

Those 19 people returned from foreign Corona reports are negative

कोरोना व्हायरसच्या संशयामुळे चीन, इराणहून आलेल्या 19 जणांची तपासणी करण्यात आली. रिपोर्ट निगेटीव्ह आलेत. पाच जणांचा 14 दिवसांचा फॉलोअप घेतला आहे. त्यांच्यावर महापालिकेचा वॉच आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी दिली.

"त्या' 19 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : कोरोना व्हायरसच्या संशयामुळे चीन, इराणहून आलेल्या 19 जणांची तपासणी करण्यात आली. रिपोर्ट निगेटीव्ह आलेत. पाच जणांचा 14 दिवसांचा फॉलोअप घेतला आहे. त्यांच्यावर महापालिकेचा वॉच आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी दिली.

डॉ. कवठेकर म्हणाले,""कोरोना व्हायरसबाबत महापालिका अर्लट आहे. सुरवातीला पालिकेचे 19 वैद्यकीय अधिकारी, 48 नर्स व 99 आशा वर्कर यांची कार्यशाळा घेतली. कोरोना व्हायरसबाबत घ्यायची काळजी, रुग्णांवरील उपचार व जनजागृतीबाबत माहिती देण्यात आली.

महापालिकेची यंत्रणा कार्यरत आहे. आशा वर्कंरांच्या माध्यमातून घर टू घर कोरोना संदर्भात सर्वे करण्यात येत आहे. नागरीकांना माहितीही देण्यात येत आहे. जनजागृतीसाठी पत्रकेही वाटली.'' 

ते म्हणाले,"" चिन, इराणहून आलेल्या 19 पैकी तीन जण बेंगलोर व मुंबईत गेलेत. पाच जणांचा 14 दिवसांचा फॉलोअप पूर्ण झाला. उर्वरीत 11 जण निगराणीखाली आहेत. घरी जावून त्यांची, कुटूंबियांची आरोग्य तपासणी रोज होत आहे. सर्वजण निगेटीव्ह आहे. घाबरण्याचे कारण नाही. विमानतळावरच त्यांची थर्मल तपासणी झाली. ती निगेटीव्ह आली. तरीही आदेशानुसार सर्वच पालिकेच्या निगराणी खाली आहेत. आरोग्य तपासणीचे अहवाल रोजच्या रोज शासनाला पाठवले जाताहेत. 

सिव्हिल, भारतीत स्वतंत्र कक्ष 

डॉ. कवठेकर म्हणाले,""महपालिका क्षेत्रातील संशयितांवर पालिकेचा वॉच आहे. कोणीही पॉझिटिव्ह आढळलेला नाही. तरीही सांगली सिव्हील व भारती हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र उपचार कक्ष सुरु करण्यात आला आहे. 

loading image