शासकीय कार्यालयात चाेरी; लाखाे रुपयांच्या दारुच्या बाटल्या पळविल्या

शासकीय कार्यालयात चाेरी; लाखाे रुपयांच्या दारुच्या बाटल्या पळविल्या
Updated on: 

वाई : येथील जुन्या बस स्थानकासमोर बंद असलेले राज्य उत्पादन शुल्क कार्यालय चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री फोडून सीलबंद करून ठेवलेली एक लाख 41 हजार 480 रुपयांची देशी-विदेशी दारू लंपास केल्याची घटना घडली आहे. दोन वर्षांपासून संबंधित कार्यालय बंद आहे. वाई पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
अनेक वर्षांपासून वाई कार्यक्षेत्राचे कामकाज या कार्यालयातून सुरू होते. मात्र, कमी मनुष्यबळामुळे 2018 मध्ये ते सातारा येथे मुख्य कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले. तत्पूर्वी या विभागाच्या वतीने वाई, पाचगणी व महाबळेश्वर परिसरात केलेल्या कारवाईत जप्त केलेला देशी- विदेशी दारूचा साठा याच कार्यालयात ठेवला होता. गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी कार्यालयाचा मुख्य दरवाजा तोडून कार्यालयात ठेवलेल्या देशी दारूच्या सुमारे 900 भरलेल्या बाटल्या, 67 हजार 480 रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या असा एक लाख 41 हजार 480 रुपयांचा माल लंपास केला आहे.

कार्यालयाशेजारी राहणारे मोहन घोडके यांनी शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता कार्यालयाचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती उत्पादन शुल्क कार्यालयाचे जवान उदयसिंह जाधव (रा. बावधन, ता. वाई) यांना दिल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. कार्यालयात प्रवेश केला असता त्यांना जप्त केलेला दस्तावेज अस्थाव्यस्त पडलेला दिसला, तर ज्या ठिकाणी जप्त केलेली दारू ठेवलेली होती, ती खोली पाहिली असता त्यांना त्याठिकाणी एकही दारूची बाटली दिसून आली नाही. जाधव यांनी याबाबतची माहिती वरिष्ठ निरीक्षक शहाजी पाटील यांना दिली. ते काही वेळानंतर घटनास्थळी पोचले.
 
याठिकाणाहून चोरी झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनीही कार्यालयाला भेट देऊन माहिती घेतली. उदयसिंह जाधव यांनी चोरीची फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कदम करीत आहेत.

लॉकडाऊनचे धडे (श्रीराम पवार) 

फलटणला उद्या रक्तदान शिबिर 

कोळकी : श्री 1008 भगवान महावीर जयंतीनिमित्त फलटण येथील ब्लड बॅंकेमध्ये जैन सोशल ग्रुपच्या वतीने सोमवारी (ता. सहा) रक्तदान शिबिर आयोजित केल्याची माहिती सचिव डॉ. ऋषिकेश राजवैद्य यांनी दिली. 
फलटण येथील डेक्कन चौकातील भारतीय स्टेट बॅंकेच्या मागे असलेल्या ब्लड बॅंकेमध्ये सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे.

 Lockdown : पाेलिस तपास सुरु; हजाराे दारुच्या बाटल्या चाेरीस

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदात्यांनी रक्तदानापूर्वी व रक्तदान केल्यानंतर कसल्याही प्रकारची गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचा नियम काटेकोरपणे सर्वांनी पाळून सहकार्य करावे, असे आवाहन जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संतोष गांधी यांनी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli District Bank Election
Koyna Dam water reuse project Maharashtra
Shiv Sena UBT leaders Belagavi entry ban November 1 2026
Harshada Deshmukh-Jadhav election victory