बेळगावात संपूर्ण परिसर भगवामय ; हजारो मराठी भाषिक रस्त्यावर 

Thousands of Marathi speakers streets to protest against the red and yellow flag being hoisted on Belgaum Municipal Corporation
Thousands of Marathi speakers streets to protest against the red and yellow flag being hoisted on Belgaum Municipal Corporation

बेळगाव : बेळगाव महापालिकेवर अनधिकृतरित्या फडकविण्यात आलेल्या लाल पिवळ्या ध्वजा विरोधात हजारो मराठी भाषिक रस्त्यावर उतरले असून महापालिकेवर भगवा फडकविण्याचा निर्धार समिती कार्यकर्तामधून व्यक्त होत आहे. 


मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठी भाषिकानी विराट मोर्चात सहभाग घेतला आहे. धर्मवीर संभाजी चौकातून मोर्चाला सुरवात झाली असून बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी गर्जना करत मोर्चा काढला जात आहे.

युवा वर्गासह महीला वर्ग आबालवृद्ध मोर्चात सहभागी झाले आहेत मात्र मोर्चात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांची पोलिसांकडून ठिकठिकाणी अडवणूक केली जात आहे. तरीही  दडपशाही झुगारून कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्याने संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे.
महापालिकेवर लावण्यात आलेला लाल पिवळा हटवावा अशी आग्रही मागणी मराठी भाषिकातून होत असून कोणत्याही परिस्थितीत लाल पिवळा हटवा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली जाणार आहे.

संपादन-अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com