बेळगाव : हजारो कामगारांना हवा ‘ईएसआयसी’चा आधार | ESIC | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ESIC
हजारो कामगार; हवा ‘ईएसआयसी’चा आधार

बेळगाव : हजारो कामगारांना हवा ‘ईएसआयसी’चा आधार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - तातडीने उपचार घेण्यासाठी उद्यमबाग येथील औद्योगिक वसाहतीत ईएसआयसीचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, याकडे ईएसआय कार्पोरेशन व राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील कामगारांना ईएसआयसीमधून तातडीची आरोग्य सेवा मिळणे कठीण बनले आहे. बेळगाव शहरात अशोकनगर येथील मुख्य ईएसआय रुग्णालयाबरोबर चन्नम्मा सर्कल, शहापूर, यमनापूर (इंडाल), उद्यमबाग व पिरनवाडी येथे डिस्पेन्सरी आहेत. तसेच नेहरुनगर केएलई, येळ्ळूर रोड केएलई, विजया ऑर्थो, श्री ऑर्थो, कॉलेज रोड रुग्णालय व बेळगाव चिल्ड्रन रुग्णालय या ठिकाणी असलेल्या खासगी रुग्णालयातही ईएसआयसीतर्फे उपचार केले जातात. ईएसआयसी रुग्णालयामध्ये उपचार झाले नसल्यास त्यांच्यावर शहरातील संलग्न असलेल्या रुग्णालयात उपचार केले जातात. सध्या ईएसआयसीचे मुख्य रुग्णालय अशोकनगर येथे आहे.

तसेच शहरासह परिसरात ईएसआयसीच्या डिस्पेन्सरी आहेत. मात्र, ईएसआयसी डिस्पेन्सरीत तातडीची सेवा मिळत नाही. शहरातील औद्योगिक वसाहतीपासून अशोकनगर लांब असल्याने तातडीने सेवा मिळणे कठीण बनले आहे. सध्या उद्यमबाग येथील औद्योगिक वसाहतीत ईएसआयसीची डिस्पेन्सरी आहे. मात्र, शस्त्रक्रिया किंवा अन्य तातडीची आरोग्य सेवा घेण्यासाठी अशोकनगर येथे जावे लागते. औद्योगिक वसाहतीत अनेक वेळा कामगार जखमी होतो.

हेही वाचा: तिळ्यांना जन्म देताच तिचा झाला मृत्यू ; 4 डॉक्टरांना नोटीस

त्यावेळी तातडीचे उपचार मिळणे आवश्यक असते. अशोकनगरातील रुग्णालयापर्यंत जाण्यास उशीर होऊ शकतो. यासाठी उद्यमबाग येथेच रुग्णालय सुरु करण्याची मागणी केली जात आहे. ईएसआय कार्पोरेशनशी संलग्न असलेल्या कामगारांकडून प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम भरुन घेतली जाते. याचा लाभ काही मोजकेच कामगार घेताना दिसतात. मात्र, रुग्णालयात सुविधा पुरविण्याकडे ईएसआय कार्पोरेशनचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

अडचणी अनेक, उपाय एकच

बेळगाव जिल्ह्यातून सुमारे १ लाख २० हजार कामगारांची नोंद ईएसआयसीकडे आहे. यामुळे प्रत्येक भागात असलेल्या ईएसआयसी डिस्पेन्सरीत तसेच अशोकनगर येथील मुख्य रुग्णालयात नेहमी गर्दी असते. मात्र, अशोकनगर येथे जाण्यासाठी औद्योगिक वसाहतीतील कामगारांना अनेक अडचणी सहन कराव्या लागतात. यासाठी उद्यमबाग येथेच सुसज्ज रुग्णालय उभारण्याची मागणी केली जात आहे.

loading image
go to top