esakal | हजार टन भाजीपाला शेतात पडून 

बोलून बातमी शोधा

Thousands of tons of vegetable fields lying on the ground in Sangali District

खानापूर तालुका (जि. सांगली) भाजीपाल्याच्या उत्पादनात अग्रेसर आहे. मात्र आता भाजीपाल्याच्या तोडणी अभावी दोन हजार भाजीपाला पडून असल्याने लाखो रुपयाचे भांडवली खर्च करून केलेला खर्च वाया जाणार असल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.

हजार टन भाजीपाला शेतात पडून 
sakal_logo
By
सचिन निकम

लेंगरे : भाजीपाल्याच्या तोडणी अभावी दोन हजार भाजीपाला पडून असल्याने लाखो रुपयाचे भांडवली खर्च करून केलेला खर्च वाया जाणार असल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. खानापूर तालुका भाजीपाल्याच्या उत्पादनात अग्रेसर आहे. या यावर्षी पुरेसा पाऊस टेंभू योजनेच्या पाण्यामुळे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासून ढबू, मिरची, टोमॅटो, वांगी, दोडका, कलिंगड, तांबडा भोपळा या भाजीपाल्याची लागवड केल्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन सुरू झाले आहे.

कोरानामुळे सर्वत्र लॉकडाऊनमुळे मुंबई, हैदराबाद, कोल्हापूर, बेळगाव मोठ्या बाजारपेठा जाणाऱ्या भाजीपाला भाजीपाल्यांची वाहतूक थांबली आहेत. तालुक्‍याच्या ठिकाणचे आठवडा बाजार बंद आहेत. भाजीपाला खरेदीसाठी येणारे परप्रांतीय व्यापारी आलेच नाहीत. परिणामी दररोज दोनशे टन भाजीपाला मोठ्या बाजारपेठा तो खासगी वाहतूक केली जात होता. मात्र दहा दिवसांपासून भाजीपाल्याची वाहतूक बंद आहे. त्यातील बाजारपेठ बंद करण्यात आल्या आहेत.

ग्रामीण भागातून शहरात भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना जाता येत नाही. परिणामी भाजीपाला तोडणी थांबली आहे. ढबू मिरची, वांगी, टोमॅटो, हिरवी मिरचीची तोडणी न झाल्याने झाडाची वाढ थांबली आहेत. दोडका, काकडी, कारली हे वेलवर्गीय भाज्या आकाराने मोठ्या झाल्यात. भाजीपाला लागवडीसाठी शेतकऱ्यांनी एक लाख रुपयांचे भांडवल कर्ज काढून खर्च केले आहे. हवामानातील बदल उन्हाची वाढलेली तीव्रता यावर मात करीत असलेल्या भाजीपाल्याची तोडणी बंद करावी लागल्याने लाखो रुपयांचं कर्ज शेतकऱ्यांच्या माथी बसणार आहे. शासनाने मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहे. 

एक लाख रुपये भांडवली खर्च

दोन एकर कलिंगड आहे सुमारे 30 टन कलिंगड खरेदीसाठी कोणी व्यापारी फिरकत नाही स्वतः शेजारच्या गावात कलिंगड विकण्याचा प्रयत्न केला. दोन रुपये किलो दराने कोणी कलिंगड घेत नाहीत. कलिंगडासाठी एक लाख रुपये भांडवली खर्च केला आहे. कर्ज निघणे देखील मुश्‍कील झाले आहे. 

- नंदकुमार माने, शेतकरी, माहुली 

मिरच्या नासून नुकसान
दीड एकरात ढबू मिरच्या आहे. आतापर्यंत मिरचीला तीन लाख रुपये भांडवली खर्च केला. एक वेळ तोडणी केली आहे. दहा दिवस झाले तोडणी न केल्याने मिरचीचे झाड ओझ्याने वाकले आहेत. व्यापारी मिरची खरेदी करण्यासाठी तयार नाही. मुंबईला वाहतूक बंद आहे. मिरच्या नासून नुकसान होत आहे. 

- योगेश जगदाळे, शेतकरी