
अन्य तीघे संशयित फरारी असून त्यांच्याकडेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
बेळगाव : दुतोंडी सापाची महाराष्ट्रात विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना रंगेहात पकडण्यात आले आहे. शनिवार (ता.9) वनविभागाच्या पोलिस पथकाने अथणी तालुक्यातील तेलसंग क्रॉस येथे ही कारवाई केली असून त्यांच्याकडून दोन दुतोंडी साप जप्त करण्यात आले आहेत. अक्षय गुरु कोट्याळ (वय 25, रा. विजापूर अक्षय गुरप्पा लाळसंगी (वय 19, रा. सिंधगी विद्यानगर) आणि दुंडाप्पा अय्याप्पा बागायत (वय 40, रा. विजापूर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. अन्य तीघे संशयित फरारी असून त्यांच्याकडेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
शनिवार (ता.9) रात्री 9 च्या सुमारास काहीजण अथणी तालुक्यातील तेलसंग क्रॉसनजिक दुतोंडी सापांची विक्री करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्याकडे दोन दुतोंडी साप असून त्यांची महाराष्ट्रात विक्री करण्यात येणार आहे. अशी खात्रीलायक माहिती वनखात्याच्या पोलिस पथकाला मिळाली होती.
हे पण वाचा - धक्कादायक : गुंगीचे औषध देऊन डांबले अन् मुलीला ठार करण्याची धमकी देऊन गर्भवतीवर केले आत्याचार
त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक रोहिणी पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचून छापा टाकला असता तीघे संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकले. शिवू मलकप्पा कमलाकर (वय 24, रा. सिंधगी विद्यानगर), शंकर काशीनाथ लोनी (रा. विजापूर), अब्दुलबाशा (रा. गुलबर्गा) हे तीघे फरारी झाले. अटकेतील संशयिताकडून दोन दुतोंडी सात व इतर साहित्य जप्त करण्यात आले. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन घेण्यात आला आहे.
संपादन - धनाजी सुर्वे