ब्रेकिंग -तबलिगीहून बेळगावात आलेले तिघे कोरोनाग्रस्त

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 April 2020

दिल्ली निजामुद्दीन येथे तबलिगी जमातमध्ये बेळगाव जिल्ह्यातून 67 जण सहभागी झाले होते. त्यापैकी 32 संशयितांचा अहवाल प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्यापैकी तिघांना कोरोना झाल्याचे निदान झाल्याने खळबळ उडाली आहे.

बेळगाव - बेळगाव तालुक्‍यातील तिघांना कोरोना संसर्ग झाल्याचे आज (ता.3) स्पष्ट झाले. बेळगावमधील कॅम्प, बेळगुंदी आणि हिरेबागेवाडी येथील प्रत्येकी एकाला संसर्ग झाला असून लॉकडाऊन ओलांडून आता कोरोना अखेर बेळगावात दाखल झाला आहे. यामुळे कोरोनाबाधित व्यक्‍ती व त्यांनी कोणाच्या संपर्कात आल्याची माहिती घेत असल्याचे पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी सांगितले.

हे पण वाचा - तर त्याचा शेतीवर गंभीर परिणाम  होईल : सतीष वाघ
 
दिल्ली निजामुद्दीन येथे तबलिगी जमातमध्ये बेळगाव जिल्ह्यातून 67 जण सहभागी झाले होते. त्यापैकी 32 संशयितांचा अहवाल प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्यापैकी तिघांना कोरोना झाल्याचे निदान झाल्याने खळबळ उडाली आहे. मार्च महिन्यात दिल्लीत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये शेकडोजणांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कर्नाटक आणि बेळगावातूनही अनेक जणांनी सहभाग नोंदविला होता. बेळगाव जिल्ह्यातून 67 जण होते, त्यांची माहिती मिल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. यानंतर 32 जण संशयित आढळून आल्याने त्यांच्या घशातील द्रव प्रयोगशाळेत पाठविले. त्यांच्या संपर्कात आलेल्या व त्यांच्या कुटुंबियांचीही माहिती घेतली जात आहे. 

हे पण वाचा -  बिस्किटे खाऊन कापले 84 कि. मी. अंतर

हिरेबागेवाडीत एकाला कोरोना झाल्याचे निदान झाले. निजामुद्दीन येथील मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रमात भाग घेतल्याने विषाणू लागण झाली आहे. यामधील लॉकडाऊनच्या काळात संशयितांनी कुटूंबिय, नातेवाईक आणि मित्रांची भेट घेतली आहे का? याची माहिती घेण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना ताब्यात घेतले जात आहे. बेळगुंदीत संशयित कोरोनाबाधीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातही या संशयिताने भाग घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

आणखी काहीजणांच्या अहवालाकडे नजर 
दिल्लीत तबलिगी जमातमध्ये बेळगावमधील 62 जणांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी 32 जण संशयित आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांचा अहवाल बंगळूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. यानंतर आज अहवाल उपलब्ध झाल्यानंतर तिघांना बाधा असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामधील उर्वरित नागरिकांच्या अहवालांकडे साऱ्यांचे लक्ष लागुन राहिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three corona positive cases in belgaum