अरेरे दुर्दैव...येथे वीज कोसळून तीन गायी मृत्यूमुखी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

सलगरे (सांगली)- मिरज तालुक्‍यातील सलगरे येथे जनावरांच्या गोठ्यावर विज पडून दोन जर्शी आणि एका देशी गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. 

सलगरे (सांगली)- मिरज तालुक्‍यातील सलगरे येथे जनावरांच्या गोठ्यावर विज पडून दोन जर्शी आणि एका देशी गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी, सलगरे-मदभावी रस्त्यावर अरुण शिवाजी पाटील (कर्नाळकर) यांच्या राहत्या घराला लागूनच जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यांमध्ये बांधलेली दोन जर्शी, एक देशी गाय व लहान वासरु आणि एक रेडी अशी एकण पाच जनावरे बांधलेली होती. दुपारी दीडच्या सुमारास सलगरे परीसरात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दोनच्या सुमारास अरुण पाटील यांच्या जनावरांच्या गोठ्यावरच विज कोसळली. त्यामध्ये दुभत्या दोन जर्शी गायी व एक देशी गाय अशा तीन गायी जागेवरच मृत्युमुखी पडल्या.

वीज कोसळून तीन गायींचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अरुण पाटील यांचे सुमारे एक लाख पंच्याऐशी हजाराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने लहान रेडकू व जर्शी गायीचे वासरु बचावले आहे. दैव बलवत्तर म्हणून गोठ्याला लागूनच असलेल्या राहत्या घरात जिवितहानी झाली नाही. वीज कोसळून तीन गायी मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळाल्यानंतर तलाठी अर्चना तोडकर, कृषी सहाय्यक गिरीश भोजे, पोलीस पाटील उद्धव खोत, कोतवाल सिध्दू लोहार यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. उपसरपंच सुरेश कोळेकर यांनी ही घटनास्थळी भेट दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three cows died here