पारनेर: फरार आरोपींपैकी तीन आरोपींना अटक

मार्तंडराव बुचुडे
रविवार, 5 ऑगस्ट 2018

या बाबत माहीती अशी की, सुमारे एक वर्षापुर्वी शेतक-यांच्या मालाला बाजार भाव मिळावा या साठी टाकळी ढोकेश्वर येथे रस्ता रोको आंदोलन केले होते. त्या वेळी लक्ष्मण ज्ञानदेव इरोळे (वय 35), बाबासाहेब गोविंद मोढवे (वय 53  दोघेही रा, पळशी) व अनिल संपत झावरे (वय 23) रा. टाकळी ढोकेश्वर यांनी एक दुधचा टँकर व भाजी पाल्याच्या गाड्या अडविल्या होत्या त्या मालाची नास धुस केली होती.

पारनेर : टाकळी ढोकेश्वर येथे शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या रस्ता रोको आंदोलनातील फरार आरोपींपैकी तीन आरोपींना आज(ता. 4 ) नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या शिवाय जबर मारहाणीच्या गुन्ह्यात हवा असलेला आणखी एका आरोपीसही या वेळी अटक केली. असे गेली वर्षभरापासून फरार असलेले व पोलिसांना हवे असलेल्या या चार आरोपींना पोलिसांनी शिताफीने अटक केली. गावात सुरू असलेल्या हरीनाम सप्ताहासाठी आले व चर्तुभुज झाले. 

या बाबत माहीती अशी की, सुमारे एक वर्षापुर्वी शेतक-यांच्या मालाला बाजार भाव मिळावा या साठी टाकळी ढोकेश्वर येथे रस्ता रोको आंदोलन केले होते. त्या वेळी लक्ष्मण ज्ञानदेव इरोळे (वय 35), बाबासाहेब गोविंद मोढवे (वय 53  दोघेही रा, पळशी) व अनिल संपत झावरे (वय 23) रा. टाकळी ढोकेश्वर यांनी एक दुधचा टँकर व भाजी पाल्याच्या गाड्या अडविल्या होत्या त्या मालाची नास धुस केली होती. त्यामुळे त्यांच्यावर दरोडा टाकणे, अनाधिकृत जमाव जमा करणे व सरकारी कामात अडथळा केल्याचे गुन्हे दाखल झाले होते. आज पळशी येथे हरीनाम सप्ताह होता त्या साठी इरोळे व मोढवे आले असता पोलिसांनी त्यांना अटक केली तर झावरे यास टाकळी ढोकेश्वर येथे अटक केली.

या शिवाय जबर मारहाण केल्याच्या कारणावरून गेली अनेक दिवसापासून फरार असलेला अारोपी सोपान अंबादास साळवे (वय 23 रा. वासुंदे) यासही पोलिसांनी अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त माहीती मिळाली होती त्यानुसार त्यांनी दत्तात्रय हिंगडे, सुनिल चव्हाण, बाळासाहेब भोपळे, संदीप  पवार, भागीनाथ पंचमुख व मल्लीकार्जुन बनकर आदींच्या पथाकासह अचनाक छापाटाकून ताब्यात घेतले. गेली वर्षभरापासून हे आरोपी पोलिसांना हवे होते.

Web Title: three criminal arrested in Parner