नातवाच्या मृत्यूच्या धक्क्याने आजी-आजोबांनीही घेतला अखेरचा श्वास! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नातवाच्या मृत्यूच्या धक्क्याने आजी-आजोबांनीही घेतला अखेरचा श्वास!

नातवाच्या मृत्यूच्या धक्क्याने आजी-आजोबांनीही घेतला अखेरचा श्वास!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बेनाडी : आडी (ता. निपाणी) (nipani) येथे नातवाच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने त्या धसक्याने एकाच दिवशी आजी-आजोबांचाही मृत्यू (grandfather -mother) झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने आडी गावावर शोककळा पसरली आहे. राकेश मारुती कुंभार (वय ३२) असे नातू तर अनुसया रामचंद्र कुंभार (वय ८०) व रामचंद्र भाऊ कुंभार (वय ८६) असे मयत आजी-आजोबांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, राकेश मारुती कुंभार यांचे शनिवार (ता. १५) निधन झाले. राकेश यांचा किराणामालचा व्यवसाय होता. (covid-19) त्यांच्या जाण्यानंतर चार दिवसांतच म्हणजे गुरुवारी (ता. २०) दुपारी राकेश यांच्या आजी अनुसया रामचंद्र कुंभार यांचे निधन झाले. तर आजोबा रामचंद्र भाऊ कुंभार यांचे पहाटे निधन झाले. पती-पत्नीचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. रामचंद्र कुंभार हे सेवानिवृत्त पोस्टमास्तर होते. त्यांच्या मागे तीन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

हेही वाचा: नक्षलवादीविरोधात लढणाऱ्या अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांवर कोरोनाचा हल्ला

loading image
go to top