सोलापूर शहरात मृतांचे त्रिशतक! आज 88 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह; पाच जणांचा झाला मृत्यू

तात्या लांडगे
रविवार, 12 जुलै 2020

ठळक बाबी...

  • आज (रविवारी) सोलापूर शहरातील 88 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत
  • रविवारी पाच व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 314 संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत
  • आतापर्यंत शहरात तीन हजार 249 कोरुना बाधित रुग्ण सापडले असून त्यापैकी 303 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे
  • एकूण रुग्णांपैकी 1770 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर 1176 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत

सोलापूर : सोलापूर शहरातील 88 व्यक्तींचे अहवाल रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर दुसरीकडे 5 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता शहरातील एकूण रुग्णांची संख्या तीन हजार 249 झाली असून त्यापैकी 303 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

'या' ठिकाणी सापडले नवे रुग्ण
शेळगी परिसरातील नटराज सोसायटीत 3, उत्तर कसबामध्ये दोन, जुना देगाव नाका येथे तीन, विजयपूर रोडवरील प्रताप नगरात चार, स्वामी विवेकानंद नगरात 3, धनराज गिरजी हॉस्पिटलमध्ये दोन, मोदी खाण्यात तीन, योगेश्वर नगरात (देगाव नाका) दोन, रेब्बा नगर (अरिहंत शाळेजवळ) दोन, मुरारजी पेठेतील रामलाल चौक परिसरात सात, लक्ष्मी बँक कॉलनी (जुळे सोलापूर) येथे तीन, जोशी गल्लीत बारा, आकाशवाणी केंद्र (गवळी वस्ती) दोन तर दत्तनगर न्यू पाच्छा पेठ येथे दोन रुग्ण सापडले आहेत. तसेच भिमाई नगर (जुळे सोलापूर), करळे वस्ती, बालाजी सोसायटी (कुमठा नाका), गवळी वस्ती, शिवानंद नगर, नामदेव नगर, विजयालक्ष्मी नगर, अरविंदधाम पोलीस वसाहत, 70 फूट रोड, विणकर गणपतीजवळ, अशोक नगर, काडादी नगर, सह्याद्री कॉम्प्लेक्स (आसरा), शुक्रवार पेठ, रविवार पेठ, पश्चिम मंगळवार पेठ, बजरंग नगर, साखर पेठ, अक्कलकोट रोड एमआयडीसी, भारती विद्यापीठजवळ, गोकुळधाम, नेहरू नगर, ब्रह्मदेव नगर, बुधवार पेठ (मोटे वस्ती), न्यू पाच्छा पेठ, मौलाली चौक, जय गुरुदेव नगर, नवजीवन सोसायटी, धनश्री लाइन (मुरारजी पेठ), जोडभावी पेठ, विजयपूर रोडवरील झोपडपट्टी क्रमांक दोन, रोहिणी नगर (सैफुल) याठिकाणी आज प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.

पाच व्यक्तींचा झाला मृत्यू
सोलापूर शहरातील रुग्णांची संख्या आता 303 झाले आहे. आज (रविवारी) एसआरपी कॅम्पजवळील पंचायती नगरातील 70 वर्षीय पुरुष, कुमठा नाका परिसरातील संजय नगरातील 54 वर्षीय महिला, कर्णिक नगरातील 80 वर्षीय पुरुष, गोकुळ नगर (सैफुल) येथील 62 वर्षीय पुरुष, शास्त्री हौसिंग सोसायटी (विकास नगर) येथील 45 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

ठळक बाबी...

  • आज (रविवारी) सोलापूर शहरातील 88 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत
  • रविवारी पाच व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 314 संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत
  • आतापर्यंत शहरात तीन हजार 249 कोरुना बाधित रुग्ण सापडले असून त्यापैकी 303 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे
  • एकूण रुग्णांपैकी 1770 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर 1176 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three hundred deaths in Solapur city! Today 88 individuals corona positive; Five people died