तीन लाख गरीबांनी घेतला शिवभोजनचा अस्वाद

विष्णू मोहिते
Saturday, 11 July 2020

सांगली ः सांगली जिल्ह्यात शिवभोजन थाळांच्या लाभ घेणाऱ्या मजूर, गरीबांची संख्या वाढते आहे. राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर शिवभोजन थाळीचा दर 5 रुपयांवर आणला. 22 मार्च पासून 9 जुलै 2020 या कालावधीत 2 लाख 81 हजार 513 एवढ्या थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. 

लॉकडाऊन काळात शिवभोजन थाळा अनेक मजुरांचा प्रमुख आधार ठरल्या. या काळात पार्सलही देण्यात आल्यामुळे अनेकांची सोय झाली. विशेष म्हणजे 10 थाळ्यांच्या पटीत मागणी, नोंदणी केल्यास जागेवर थाळ्या पोहोच करण्यात आल्या आहेत.

राज्यातील गरीब व गरजू जनतेला स्वस्त दरात जेवण उपलब्ध व्हावे उद्देशाने राज्यात शिवभोजन योजना सुरु करणेत आलेली आहे. सांगली जिल्ह्यात सद्या एकूण 21 शिवभोजन केंद्र कार्यरत असून प्रतिदिन 3000 शिवभोजन थाळींचे वाटप केले जाते.

लॉकडाऊन कालावधीत 30 सप्टेंबर 2020 पर्यंत 5 रुपयामध्ये शिवभोजन उपलब्ध करुन देणेबाबत राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे. 22 मार्च ते 9 जुलै 2020 या कालावधीत 2,81,513 इतक्‍या व्यक्तींनी शिवभोजन योजनेचा लाभ घेतलेला आहे. 

संपादन ः अमोल गुरव 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three lakh poor people tasted Shiva food

Tags
टॉपिकस
Topic Tags: