विविध कारणांवरून तीन पोलिस हवालदार अधीक्षकांकडून निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

सातारा - अवैध धंद्यांवर कारवाई न करणे, तक्रारदार व सहकाऱ्यांशी उद्धट बोलणे, पैशाची मागणी करणे तसेच न सांगता कर्तव्यावर गैरहजर राहण्याच्या बेजबाबदारपणाबद्दल तीन पोलिस हवालदारांना पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी निलंबित केले आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातील हवालदार नानासाहेब काका कांबळे, अनिता बाबासाहेब पानसरे व मुख्यालयातील मधुकर पांडुरंग धुमाळ अशी त्यांची नावे आहेत. 

कांबळे हे सरडे बिटचे अंमलदार होते. बिटमधील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले होते. तरीही त्यांच्या परिसरात अवैध धंदे सुरू असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असून या कालावधीत त्यांना पुसेगाव पोलिस ठाणे देण्यात आले आहे. अनिता पानसरे या फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अंमलदार म्हणून नेमणुकीस असताना तक्रारदाराबरोबर उद्धटपणे बोलत होत्या. त्यांच्या तक्रारी जाणून न घेता अरेरावीची भाषा वापरायच्या. तक्रार दाखल करण्यासाठी पैशाची तसेच कार्यालयीन कामकाजासाठी लागणाऱ्या वस्तूंची मागणी करणे आदी कारणांवरून त्यांना सेवेतून निलंबित करून प्राथमिक चौकशी लावण्यात आली आहे. या कालावधीत त्यांना वाठार पोलिस ठाणे देण्यात आले आहे. हवालदार मधुकर धुमाळ नेमलेल्या कर्तव्याच्या ठिकाणी वारंवार गैरहजर राहात असल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांना पाटण पोलिस ठाणे मुख्यालय देण्यात आले आहे.

Web Title: three police constable Suspended by Superintendent

टॅग्स