Gharkul Scheme : तीन हजार कुटुंबांना मिळणार हक्काचं घर

वाळवा तालुक्यात केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजनांतून सन २०१६-१७ ते २०२३-२४ या कालावधीत ३ हजार ६४६ घरकुले मंजूर झाली आहेत.
Walwa Panchyat Samiti
Walwa Panchyat Samitisakal

इस्लामपूर - वाळवा तालुक्यात केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजनांतून सन २०१६-१७ ते २०२३-२४ या कालावधीत ३ हजार ६४६ घरकुले मंजूर झाली आहेत. त्यापैकी २ हजार ९२६ घरकुले पूर्ण झालेली आहेत. घरकुले पूर्ण करण्याचे प्रमाण ८४.२२ टक्के आहे. यासाठी ३५ कोटी ११ लाख २० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी दिली.

गरजवंत नागरिकांसाठी शासन विविध योजना राबवून घरकुल मंजूर करुन देत आहे. त्यामध्ये केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रधानमंत्री आवास योजनें’तर्गत सन २०१६-१७ ते २०२३-२४ या कालावधीत वाळवा तालुक्यात १५६१ घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्यामधील १५६० घरकुले मंजूर करण्यात आली आहेत, तर १४१५ घरकुले पूर्ण झलेली आहेत. घरकुले पूर्ण होण्याचे प्रमाण ९०.७० टक्के आहे. उर्वरित घरकुलांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे.

राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रमाई आवास योजनें’तर्गत १६६७ घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्यामधील १६६७ घरकुले मंजूर देण्यात आली आहेत, तर १४६४ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. या योजनेंतर्गत घरकुलांचे प्रमाण ८७.८ टक्के आहे. ‘मोदी आवास योजने’मार्फत २५५ घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्यामधील २५५ घरकुलांना मंजूर देण्यात आली आहे, तर ४७ घरकुल घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे या योजनेतील घरकुलांचे प्रमाण १८.४३ टक्के आहे.

‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत सन २०२३-२४ या वर्षात वाळवा पंचायत समितीचे वैयक्तिक स्वच्छतागृहाचे ६९१ चे उद्दिष्ट होते. परंतु त्यामधील ६०२ लाभार्थींनी वैयक्तिक स्वच्छतागृहाचे बांधकाम पुर्ण केले. त्या सर्व लाभार्थींना प्रत्येकी १२ हजार रुपयांप्रमाणे ७२ लाख २४ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित पात्र लाभार्थींना स्वच्छतागृहाचे काम पूर्ण करावे.

साडेपाच हजार लाभार्थींना नळजोडणी

जिल्हास्तरावरून ६ ग्रामपंचायतींना १ कोटी ५ लाख ९२ हजार ४९ रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहेत, तर तालुकास्तरावरून ३७ ग्रामपंचायतींना १ कोटी ३४ लाख ९६ हजार ५०३ रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

‘जलजीवन मिशन’अंतर्गत तालुक्यातील १० हजार १२५ कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचे नळ जोडण्याचे उद्दिष्ट होते. त्या मधील ५ हजार ४२० कुटुंबांना पिण्याच्या पाण्याची जोडणी देण्यात आलेली आहे. या योजनांमुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com