गोव्याचं दर्शन होण्यापूर्वीच काळाची झडप; तीन पर्यटकांचा जागीच मृत्यू

Belgaum Accident
Belgaum Accidentesakal
Summary

हे जिवलग मित्र स्विफ्ट कारमधून पर्यटनासाठी गोव्याला जाण्यासाठी निघाले होते.

बेळगाव (कर्नाटक) : भरधाव मोटारीची रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडाला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात बेळगावातील (Belgaum Accident) तिघे पर्यटक जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. रविवार (ता. २१) पहाटे ४ च्या सुमारास शिओली म्हापसा मुख्य रस्त्यावरील कुचेली नजीक हा अपघात घडला असून अपघाताची नोंद म्हापसा पोलीस ठाण्यात (Mapusa Police Station) झाली आहे.

नायर हसनसाब अनगोळकर (वय २८, रा. श्री महालसा नववा क्रॉस भाग्यनगर), रोहन महादेव गडाद (वय २६) आणि सनी परसाप्पा अनवेकर (वय ३१, दोघेही रा. बेळगाव) अशी मयतांची नावे असून विशाल विलास कारेकर (वय २७, रा. बेळगाव) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर बांबोळी येथील गोमेकॉत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत म्हापसा पोलीसातून समजलेली अधिक माहिती अशी, वरील सर्व जिवलग मित्र असून ते काल रात्री केए २२ एमए ९८१३ या क्रमाकांच्या स्विफ्ट मोटारीतून पर्यटनासाठी गोव्याला (Goa) जाण्यासाठी निघाले होते. नायर हा मोटार चालवत होता. ते शिओली म्हापसा मुख्य रस्त्यावरील कचेली नजीक आले असताना चालक नायरला डुलकी आली. त्यामुळे त्याचा मोटारीवर ताबा सुटल्याने मोटार सरळजावून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोरदार जाऊन आदळली.

Belgaum Accident
Electric Bike ची बॅटरी चार्जिंगला लावताना लागला शाॅक; 23 वर्षीय युवतीचा मृत्यू

यावेळी झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिघे जण जागीच ठार झाले. तर विशाल गंभीर जखमी झाला. अपघातानंतर कारचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. पहाटे चारच्या दरम्यान घडलेल्या अपघाताची माहिती समजताच म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला गोमेकॉत रुग्णालयात हलविले. त्यानंतर मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. यावेळी चालकाच्या खिशात आढळून आलेल्या वाहन परवान्यावरून सर्वजण बेळगावचे असल्याचे खात्री पटली. त्यानंतर संबंधितांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना गोव्याला पाचारण करण्यात आले. मोटार चालक नायर हा श्री महालसा नववा क्रॉस भाग्यनगर बेळगाव येथील असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, अन्य दोघा मृतांचे आणि जखमीचा बेळगाव मुळ पत्ता सायंकाळी उशिरापर्यंत समजू शकला नाही. म्हापसा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह गोमेकॉत रुग्णालयात हलविले. त्याठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत शल्यचिकित्सा करण्याचे काम सुरू होते. गोव्याला पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांवर गोव्याचे दर्शन होण्यापूर्वीच काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com