कोल्हापूरचा ‘वाघ’ पोहोचला जगभरात !

बी. डी. चेचर
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना काहीतरी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे; परंतु या संकल्पनेला फाटा देत वाघांची घटती संख्या आणि एकूणच वाघांच्या संवर्धनासाठी येथील तरुणांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद ठरतो आहे. 

कोल्हापूर - आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना काहीतरी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे; परंतु या संकल्पनेला फाटा देत वाघांची घटती संख्या आणि एकूणच वाघांच्या संवर्धनासाठी येथील तरुणांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद ठरतो आहे. 

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून स्मृतिचिन्ह म्हणून वाघाचे शिल्प विविध कार्यक्रमांत सेलिब्रिटींना देण्याचे ठरवले. हे शिल्प करण्याचा मान कोल्हापूरच्या चार तरुणांना मिळाला. जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक व पगमार्क आर्ट गॅलरीचे रमण कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही निर्मिती झाली.

प्रत्यक्ष आकारातील वाघाची प्रतिकृती मुंबई येथील मंत्रालयात सेल्फी पॉईंट म्हणून बसवली आहे. त्याचे उद्‌घाटन नुकतेच राज्यपाल सी. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या लहान वाघांच्या स्मृतिचिन्ह शिल्पात वाघाच्या डरकाळीच्या आवाजाची यंत्रणाही बसविली आहे.

शिल्पावरील स्विच ऑन केल्यानंतर वाघाच्या डरकाळीचा आवाज सर्वत्र घुमतो. कोल्हापुरातून शिक्षण घेतलेल्या सुनील खाडे, सागर गाडे, पवन माने आणि रमण कुलकर्णी यांनी यासाठी परिश्रम घेतले. ही स्मृतिचिन्हे आजवर रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पियूष गोयल, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, नितीन गडकरी आदींसह विविध देशांतील राजदूतांना दिली आहेत.

व्याघ्र जतन संवर्धनाचा संदेश सर्वत्र जावा, या उद्देशाने जे काही उपक्रम राबवले जातात, त्यातीलच एक पाऊल म्हणून 
ही संकल्पना पुढे आली आणि ती आता केवळ देशातच नव्हे तर जगभरात कौतुकास पात्र 
ठरते आहे. 
- रमण कुलकर्णी, 

   मानद वन्यजीव रक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tiger conservation message through Craft