सांगली : टिंबर एरिया परिसरातील भीमनगर येथील झोपड्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेचे पथक तयारीनिशी दाखल झाले. पण महिला, नागरिकांनी झोपड्या हटविण्यास तीव्र विरोध केला. काही महिला पथकाच्या अंगावरही धावून गेल्या. .या प्रकारामुळे काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी विश्रामबाग पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. अखेर रस्त्यावरील १४ पैकी केवळ दोन पत्र्याचे शेड हटवून महापालिकेचे पथक माघारी फिरले..Sangli Missing Person Found : दीड वर्षांनंतर बार्शीला परतलेल्या विजयाबाईंनी पकडला भावनिक धागा; ओडिशात हरवलेली ७३ वर्षीय आई मुलीला परत मिळाली प्रशासनाच्या तत्परतेमुळे.मीरा हौसिंग सोसायटीकडून भीमनगर ते शिंदे मळा रेल्वे पुलापर्यंत ऐंशी फुटी रस्ता आहे. तेथील नाल्यालगतच रस्त्यावर पत्र्याचे शेडवजा झोपड्या उभारून काही नागरिक ३० ते ४० वर्षांपासून राहत आहेत. .नाल्याजवळच एका महिलेचा प्लॉट असून त्याकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनी महापालिकेच्या नागरी संवाद कार्यक्रमात तक्रार केली होती. त्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी महापालिकेने रस्त्यावरील १४ झोपडपट्टीधारकांना नोटीस बजाविली..Sangli Leopard : ऊसामध्ये वाढलेला बिबट्यांचा वावर आणि महावितरणचा रात्रीचा वीज पुरवठा; शेतकरी अक्षरशः जीव मुठीत धरून शेतात.दोन दिवसांपूर्वी ‘नागरी संवाद’मध्ये संबंधित महिलेने अतिक्रमण न हटविल्यास आत्मदहनाचा इशारा दिला होता. अखेर आयुक्त सत्यम गांधी यांनी अतिक्रमणविरोधी पथकाला तातडीने झोपड्या हटविण्याचे आदेश दिले..त्यानुसार आज सहाय्यक आयुक्त नागार्जुन मद्रासी, नगररचना विभागाचे अभियंते हणमंत म्हारनूर, आरेखक गेजगे यांच्यासह महापालिकेचे पथक जेसीबीसह भीमनगरमध्ये आले. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव, उपनिरीक्षक सतेज कार्वेकर, प्रवीण कांचन यांच्यासह राखीव दलाची तुकडी, जलद कृती दलाची तुकडी असा मोठा पोलिस फौजफाटाही दाखल झाला..महापालिकेने पथकाने एका अतिक्रमणावर जेसीबी चालविला. त्यानंतर इतर झोपड्या हटविल्या जाणार, असे दिसताच तेथील महिला, तरुण आक्रमक झाले. ‘४० वर्षांपासून इथे राहत असून आमची व्यवस्था केल्याशिवाय झोपड्या हटवू देणार नाही,’ अशी आक्रमक भूमिका महिलांनी घेतली. त्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. .यावेळी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, प्रफुल्ल ठोकळे, उत्तम कांबळे, सूरज पवार, गीता पवार, सुजित काटे, अशोक मासाळे, तसेच भाजप नेत्या नीता केळकर यांनी आयुक्तांसह अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर रस्त्यावरील १४ झोपड्यांऐवजी तक्रारदार महिलेच्या प्लॉटकडे जाणाऱ्या रस्त्यातील २ झोपड्या हटवण्यावर सहमती झाली. या दोन झोपड्या हटवून महापालिकेचे पथक परतले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.