esakal | कोरोना रुग्णांमध्ये सकारात्मकतेची पेरणी करणारा विश्वास
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना रुग्णांमध्ये सकारात्मकतेची पेरणी करणारा 'विश्वास'

कोरोना रुग्णांमध्ये सकारात्मकतेची पेरणी करणारा 'विश्वास'

sakal_logo
By
स्वप्नील पवार

देवराष्ट्रे : कोरोनाने (covid-19) संपुर्ण देशाला हादरवून सोडले आहे. कोरोनाचा दररोज वाढणारा रुग्णाचा आकडा धडकी भरवणारा आहे. या वैश्विक महामारीत अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. कोरोना झालेल्यांचे मन प्रसन्नता, आनंदापेक्षा चिंता नैराश्याने ग्रासली आहेत. यावेळी त्यांच्याजवळ आप्तेष्ट, नातेवाईक, जवळचे कोणीही नसते. ते एकाकी असतात. विश्वास, सकारात्मकतेद्वारे संकटावर विजय मिळवता येतो. हे देवराष्ट्रे येथील विश्वास गुरव आपल्या प्रबोधनातून कोरोना रुग्णांना कोविड सेंटरमध्ये जावून सकारात्मक विचारांची पेरणी करत आहेत.

देवराष्ट्रे येथील विश्वास गुरव हे अमरापूर (ता. कडेगाव) येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. कोरोनाच्या महामारीत (sangali district) एक शिक्षक पेशातील विश्वास गुरव कोरोना रुग्णांना प्रबोधन करीत आहे. आशादायी दृष्टिकोन, सकारात्मक भावना, मनातील आशेचा किरण ठेवल्यास आपण कोरोनावर मात करू शकतो. त्यामुळे खचायचं नाय लढायचं, असा मानसिक आधार त्यांच्या प्रबोधनातून देत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून विश्वास गुरव हे कोरोना रुग्णांना कोरोना सेंटरवर (corona centre) जाऊन प्रबोधन करीत आहेत. विशेष बाब म्हणजे कोणतेही शुल्क न घेता प्रबोधन करीत आहेत. पदरमोड करून कोरोना रुग्णांना सकारात्मक विचारांची पेरणी करणारे विश्वास गुरव हे सोशल मीडियावर (social media) चर्चेत आहेत.

हेही वाचा: कैद्यांच्या पत्नीस पती मिलनाची मुभा द्या; अण्णा डांगेंची मागणी

"कोरोना रूग्णांच्या मनावर मायेची फुंकर म्हणून एक उपक्रम हाती घेतला आहे. कोरोना काळात मनावरील ताण-तणाव कमी करण्याचे व त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम प्रबोधनातून करीत आहे."

- विश्वास गुरव

loading image