esakal | कैद्यांच्या पत्नीस पती मिलनाची मुभा द्या; अण्णा डांगेंची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

कैद्यांच्या पत्नीस पती मिलनाची मुभा द्या; अण्णा डांगेंची मागणी

कैद्यांच्या पत्नीस पती मिलनाची मुभा द्या; अण्णा डांगेंची मागणी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

इस्लामपूर : कैद्यांना कारागृहाच्या कक्षेत सोय निर्माण करून पत्नी मिलनाची मुभा द्यावी. त्यासाठी शुल्क आकारणीही करावी अशी सूचना माजी मंत्री अण्णा डांगे यांनी राज्याचे कारागृह महानिरीक्षक सुनिल रामानंद यांना केली आहे. श्री रामानंद यांनी नुकतेच एका आदेशाद्वारे कारागृह कॅन्टीनमध्ये चिकन पासुन पनीर, श्रीखंड आदि ८५ प्रकारचे पदार्थ विकत घेण्याची मुभा दिली असून त्याचे डांगे यांनी स्वागत केले आहे.

हेही वाचा: वॉशिंग मशीन खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या लेटेस्ट टेक्नोलॉजी

डांगे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आहाराबाबतच्या निर्णयाचे कोणी स्वागत करो अथवा नाके मुरड तरी त्याला महत्व असणार नाही. परंतु माणुसकीच्या भावनेतून हा निर्णय योग्यच आहे. सर्व कैदी त्याचे स्वागत करतील. यानिमित्ताने कैद्यांना सोई सुविधांचा विषय पुढे आला असून यानिमित्ताने आणखी एका महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले पाहिजे. आपली समाज व्यवस्था पुरूष प्रधान आहे. पुरुषांच्या गुन्ह्याची शिक्षा स्त्रियांनाही होत असते. कधी कधी अपरिहार्य कारणातून गुन्हा घडतो. मात्र शिक्षा केवळ गुन्हेगाराला नव्हे तर कुटुंबालाही भोगावी लागते. त्याच्या पत्नीला प्रपंच सांभाळावा लागतो. त्याचवेळी पतीशी ताटातुटीच दुःख भोगावे लागते. त्यात तिचा काहीही दोष नसतो. पती सुखापासुन पारखे झलेल्या स्त्रियांना किमान तिच्या इच्‍छेनुरुप पती मिलनापासून वंचित ठेवू नये. तिच्यावर ही लादलेली शिक्षा टाळता येणे शक्य आहे. त्यासाठी कैद्यांच्या पत्नीच्या भाव भावनांचा विचार मोठ्या मनाने व उदार अंतःकरणाने करावा. त्यासाठी नियम अटी निश्‍चित कराव्यात. सामाजिक स्वस्थ्यासाठीही हा निर्णय उपकारक ठरेल. कारागृह परिसरात सुविधा केल्यास नवे प्रश्‍न तयार होणार नाहीत. त्यामुळे तुरुंग व्यवस्थेवरील अनेक ताणही कमी होतील. कारागृह विभागला उत्पन्नही मिळेल.

हेही वाचा: आता बस्स! सांगलीत पृथ्वीराज पवार यांचा जयंत पाटील यांना इशारा

loading image