सोलापूर शहरात 102 पॉझिटिव्ह ! 34 वर्षीय पुरुषासह तिघांचा कोरोनाने घेतला बळी 

तात्या लांडगे
Sunday, 19 July 2020

ठळक बाबी... 

 • आतापर्यंत शहरातील 19 हजार 241 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
 • शहरात तीन हजार 804 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह; दोन हजार 102 रुग्णांची कोरोनावर मात 
 • आज तिघांचा मृत्यू; शहरातील मृतांची संख्या झाली 325 
 • रविवारी (ता. 19) 588 जणांनी कोरोना टेस्ट; 27 रुग्णांना आज सोडले घरी 
 • शहरातील एक हजार 170 व्यक्‍ती होम क्‍वारंटाईन तर 960 व्यक्‍ती संस्थात्मक विलगीकरणात 
 • सद्यस्थितीत शहरातील विविध रुग्णालयांमध्ये एक हजार 377 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 

सोलापूर : शहरातील 588 व्यक्‍तींचे अहवाल आज (रविवारी) प्राप्त झाले असून त्यापैकी 102 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर व्ही.एम. मेडिकल सोसायटीतील 75 वर्षीय महिलेचा, विजयपूर रोडवरील कमला नगरातील 34 वर्षीय पुरुषाचा आणि आसरा परिसरातील 57 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील रुग्णांची एकूण संख्या तीन हजार 804 झाली असून मृतांची संख्या 325 झाली आहे. 

'या' भागात सापडले नवे रुग्ण 
रेल्वे लाईन फॉरेस्ट, रेसिडेंट डॉक्‍टर क्‍वार्टर, थोबडे वस्ती (देगाव नाका), बुधवार पेठ, निलम नगर (एमआयडीसी), आदित्य नगर (विजयपूर रोड), टिळक नगर, रामवाडी, उत्तर सदर बझार, बेडर पुलाजवळ, विष्णू मिल चाळ, जम्मा वस्ती, हनुमान नगर, वर्धमान नगर, बाळे, गीता नगर, अंबिका नगर (नई जिदंगी), रेवणसिध्देश्‍वर नगर, मजरेवाडी, रेल्वे सोसायटी, स्वागत नगर, भूषण नगर, डफरीन चौक, आरटीओ ऑफिसजवळ, विजापूर नाका, गांधी नगर, वैष्णवी नगर (सैफूल), ईश्‍वर नगर (अक्‍कलकोट रोड), मुरारजी पेठ, अरविंदधाम, कमला नगर, पश्‍चिम मंगळवार पेठ, शेळगी, जुळे सोलापूर, भवानी पेठ, राहूल नगर, कुमठे, मोदीखाना, विडी घरकूल, एमआयडीसी, होटगी रोड याठिकाणी आज नवे रुग्ण सापडले आहेत.

ठळक बाबी... 

 • आतापर्यंत शहरातील 19 हजार 241 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
 • शहरात तीन हजार 804 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह; दोन हजार 102 रुग्णांची कोरोनावर मात 
 • आज तिघांचा मृत्यू; शहरातील मृतांची संख्या झाली 325 
 • रविवारी (ता. 19) 588 जणांनी कोरोना टेस्ट; 27 रुग्णांना आज सोडले घरी 
 • शहरातील एक हजार 170 व्यक्‍ती होम क्‍वारंटाईन तर 960 व्यक्‍ती संस्थात्मक विलगीकरणात 
 • सद्यस्थितीत शहरातील विविध रुग्णालयांमध्ये एक हजार 377 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: today 103 positives in Solapur city Corona killed three people, including a 34-year-old man