सोलापूर ग्रामीणमध्ये सातशेपार रुग्ण! आज सापडले 37 पॉझिटिव्ह अन्‌ दोघांचा मृत्यू; 'या' सापडले नवे रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जुलै 2020

'या' गावात सापडले नवे रुग्ण 
शुक्रवारी (ता. 10) उत्तर सोलापुरातील नान्नज येथे दोन, मार्डीत सहा, तिऱ्ह्यात दोन तर माळशिरस तालुक्‍यातील शिंदेवाडीत एक, मोहोळमधील साठे नगरात एक, कोरवली व देवडीत प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तसेच बार्शीतील भवानी पेठ, सुभाष नगर, सासुरे व वैरागमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची भर पडली आहे. मंगळवेढ्यातील गुंगे गल्लीत एक, पंढरपुरातील जुनी पेठेत एक, बसवेश्‍वर नगर (इसबावी) दोन, संत पेठेत एक, जिजाऊ नगर, यमाई-तुकाई मंदिराजवळ एक आणि अक्‍कलकोटमधील स्वामी विवेकानंद पार्क येथे एक, बुधवार पेठेत एक, भारत गल्लीत चार, मैंदर्गी रोडवर एक, करजगीत दोन तर भोसगा येथे तीन रुग्णांची भर पडली आहे. आता एकूण रुग्णांची संख्या 710 झाली असून मृतांची संख्या 32 झाली आहे. 

सोलापूर : ग्रामीण भागात आज 37 व्यक्‍तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर तिऱ्हे येथील 73 वर्षीय पुरुष तर अक्‍कलकोटमधील बुधवार पेठेतील 65 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मंगळवारी मृत्यू झाला. एकूण रुग्णांची संख्या आता 710 झाली असून मृतांची संख्या 32 झाली आहे. 

आज जिल्ह्यातील 382 व्यक्‍तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये 245 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 68 संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत. आता अक्‍कलकोट तालुक्‍यातील रुग्णांची एकूण संख्या 135, बार्शी 121, करमाळा सहा, माढा 18, माळशिरस सात, मंगळवेढा तीन, मोहोळ 37, उत्तर सोलापूर 86 तर पंढरपूर 40, सांगोला पाच आणि दक्षिण सोलापुरात 252 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत 329 व्यक्‍तींनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर 349 रुग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होते. 
 
'या' गावात सापडले नवे रुग्ण 
शुक्रवारी (ता. 10) उत्तर सोलापुरातील नान्नज येथे दोन, मार्डीत सहा, तिऱ्ह्यात दोन तर माळशिरस तालुक्‍यातील शिंदेवाडीत एक, मोहोळमधील साठे नगरात एक, कोरवली व देवडीत प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तसेच बार्शीतील भवानी पेठ, सुभाष नगर, सासुरे व वैरागमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची भर पडली आहे. मंगळवेढ्यातील गुंगे गल्लीत एक, पंढरपुरातील जुनी पेठेत एक, बसवेश्‍वर नगर (इसबावी) दोन, संत पेठेत एक, जिजाऊ नगर, यमाई-तुकाई मंदिराजवळ एक आणि अक्‍कलकोटमधील स्वामी विवेकानंद पार्क येथे एक, बुधवार पेठेत एक, भारत गल्लीत चार, मैंदर्गी रोडवर एक, करजगीत दोन तर भोसगा येथे तीन रुग्णांची भर पडली आहे. आता एकूण रुग्णांची संख्या 710 झाली असून मृतांची संख्या 32 झाली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today 37 positive patients were found in Solapur rural