टॉपर्सच्या उत्तरपत्रिका दिसणार आता 'या' संकेतस्थळावर...

Toppers answer sheets will now appear on the website belgum marathi news
Toppers answer sheets will now appear on the website belgum marathi news
Updated on

बेळगाव - पदवीपूर्व शिक्षण विभागाने बारावी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत. २०१९ साली झालेल्या बारावीच्या मुख्य परीक्षेत प्रत्येक विषयातील ‘टॉपर’ शिक्षण विभागाने शोधला आहे. त्यानुसार ३६ टॉपर्सच्या उत्तरपत्रिका पदवीपूर्व शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केल्या आहेत. काही विषयांच्या दोन उत्तरपत्रिका उपलब्ध करून दिल्या असून मार्च २०२० मध्ये बारावीची परीक्षा देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांना या उत्तरपत्रिका महत्त्वाच्या ठरणार आहेत.

पदवीपूर्व शिक्षण खात्याकडून अपलोड

बारावीच्या मुख्य परीक्षेत प्रश्‍नपत्रिका कशी सोडवावी? उत्तरे कशी लिहावीत? कोणत्या प्रश्‍नांना प्राधान्य द्यावे, याची माहिती या उत्तरपत्रिकांमुळे मिळणार आहे. पदवीपूर्व शिक्षण खात्याने पहिल्यांदाच हा उपक्रम राबविला आहे. बारावीचा निकाल वाढविण्यासाठी शिक्षण खात्याकडून विविध उपक्रम राबविले जातात. यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका सोडविण्याचा सराव होण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. बारावी परीक्षेचे मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विषयातील टॉपर शोधला जातो. त्या विद्यार्थ्याने प्रश्‍नपत्रिका कशी सोडविली याची माहिती घेतली जाते. पण, ती माहिती यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणार असून उत्तरपत्रिकाच थेट उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, संबंधित विद्यार्थ्याचे नाव उत्तरपत्रिकेवरुन काढून ती स्कॅन करून संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत

बारावीच्या परीक्षेला अद्याप तीन महिन्यांचा अवकाश आहे. या काळात विद्यार्थ्यांना त्या उत्तरपत्रिकांचा अभ्यास करता येईल. कला, वाणिज्य, विज्ञान तसेच पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या सर्व शाखांशी संबंधित ३६ उत्तरपत्रिका संकेतस्थळावर आहेत. यासंदर्भात आता संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणे आवश्‍यक आहे. तसेच त्या उत्तरपत्रिकांची मुद्रीत प्रत विद्यार्थ्यांना देणे आवश्‍यक आहे. बारावी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांसाठी नवनवे उपक्रम सुरू केले आहेत. पण, विद्यार्थ्यांपर्यंत त्यांची माहिती पोहोचणे आवश्‍यक आहे. 
चार महिन्यांपूर्वी पदवीपूर्व शिक्षण खात्याने टॉपर्सच्या उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मार्च २०१९ मध्ये झालेल्या बारावी परीक्षेतील विषयनिहाय टॉपर्सच्या उत्तरपत्रिकाच उपलब्ध करून दिल्या आहेत. इंग्रजी विषयात २०१९ मध्ये ज्या विद्यार्थ्याने ९८ गुण मिळविले होते, त्याची उत्तरपत्रिकाही उपलब्ध करून दिली आहे.

या विषयांच्या उत्तरपत्रिका उपलब्ध

कन्नड, इंग्रजी, संस्कृत, इतिहास, भूगोल, बिजनेस स्टडीज, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अकौंटन्सी, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, संगणक विज्ञान, शिक्षणशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, पायाभूत गणित, ऐच्छिक कन्नड या सर्व विषयांच्या प्रत्येकी दोन उत्तरपत्रिका पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या www.pue.kar.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com