पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंचा पहिला प्रयाेग

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 January 2020

स्पर्धकांनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो, व्हिडिओ हे #MaharashtraTourismContest आणि #MaharashtraTourism या हॅशटॅगसह पोस्ट करणे आवश्‍यक आहे. तसेच पर्यटन विभागाचे @Maharashtra TourismOfficial हे फेसबूक पेज आणि @MaharashtraTourismofficial हे इन्स्टाग्राम पेज फॉलो करावे, असे आवाहन पर्यटन संचालनालयामार्फत करण्यात आले आहे. 

मुंबई : राज्यातील किल्ले पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाद्वारे 8 ते 22 जानेवारी या कालावधीत सोशल मीडियावर गड - दुर्ग किल्ल्यांवर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. यामध्ये व्हिडिओग्राफी व छायाचित्रण यांचा समावेश असेल.

हेही वाचा - सिंधुदुर्गात पर्यटनासाठी जाणार आहात, मग हे जरूर वाचा...
 
"राज्यातील ऐतिहासिक वारसास्थळांची देश - विदेशातील पर्यटकांना ओळख करून देणे, सर्वसामान्यांमध्ये गड - दुर्ग किल्ल्यांबाबत आकर्षण व आवड निर्माण करणे, तसेच पर्यटक व अभ्यागतांना या किल्ल्यांबाबतची ऐतिहासिक माहिती करून देणे, हा या स्पर्धेच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे,' असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास यासाठी विविध उपक्रम राबविले जातील, असेही आदित्य म्हणाले.

हेही वाचा - #JNUAttack : लिडर हवा तर असा सोनमने केलं आदित्य ठाकरेंचं कौतुक
 
ही स्पर्धा व्हिडिओग्राफी व छायाचित्रण या दोन प्रकारांची आहे. स्पर्धा खुली श्रेणी व व्यावसायिक श्रेणी या दोन विभागांत असेल. ज्यांना छायाचित्रण किंवा व्हिडिओग्राफीमध्ये आवड आहे, त्यांच्यासाठी खुली श्रेणी आहे. सर्व स्तरातील लोकांसाठी ही श्रेणी आहे. या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये आणि 10 विशेष उल्लेखनीय स्पर्धकांसाठी प्रत्येकी दोन हजार रुपये पारितोषिक राहील. स्पर्धेत दुसरी व्यावसायिक श्रेणी आहे. यातील छायाचित्रण स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये आणि 10 विशेष उल्लेखनीय स्पर्धकांसाठी प्रत्येकी 10 हजार रुपये पारितोषिक राहील.

व्यावसायिक श्रेणी

व्यावसायिक श्रेणीतील व्हिडिओग्राफी स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 75 हजार रुपये व तृतीय पारितोषिक 50 हजार रुपये असेल. 10 विशेष उल्लेखनीय स्पर्धकांसाठी प्रत्येकी 25 हजार रुपये पारितोषिक राहील. 

 येथे करा अपलोड 

स्पर्धकांनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो, व्हिडिओ हे #MaharashtraTourismContest आणि #MaharashtraTourism या हॅशटॅगसह पोस्ट करणे आवश्‍यक आहे. तसेच पर्यटन विभागाचे @Maharashtra TourismOfficial हे फेसबूक पेज आणि @MaharashtraTourismofficial हे इन्स्टाग्राम पेज फॉलो करावे, असे आवाहन पर्यटन संचालनालयामार्फत करण्यात आले आहे. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourism Minister Aditya Thackeray Annouced Gad Durg Videography and Photography Competition