
वारणावती : मणदूर (ता.शिराळा) येथे श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या आंदोलनाचा ३१ वा दिवस आहे. आजअखेर त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी मंत्रालयात बैठक घेऊन त्यांच्या पुनर्वसनातील अडथळा दूर करण्यासाठी शासन व प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे आज खुंदलापूर व झोंळबी येथे जाणाऱ्या पर्यटकांचा रस्ता आंदोलकांनी अडवला.