
कडेगाव : सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत कडेगाव तालुका विसावला आहे. सध्या पाऊस कोसळत असल्याने डोंगरदऱ्या हिरव्यागार झाल्याने निसर्ग सौंदर्यात वाढ झाली आहे. नयनरम्य, डोळ्यांचे पारणे फेडणारा, मनाला सुखद अनुभव देणारा निसर्गाच्या कुशीत वसलेल्या येथील सागरेश्वर अभयारण्य, चौरंगीनाथ व डोंगराई मंदिर परिसर पर्यटकांना खुणावू लागला आहे.