कोल्हापूरजवळ पुणे बंगळूर महामार्गावर कशामुळे वाहतूक संथ गतीने ?

Traffic Jam On Pune Banglore Highway Near Kolhapur
Traffic Jam On Pune Banglore Highway Near Kolhapur
Updated on

उजळाईवाडी  ( कोल्हापूर) : विमानतळावर नाईट लँडिंग करता यावे यासाठी अडथळा ठरणाऱ्या सर्व गोष्टी काढण्यात येत आहेत. हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यासाठी पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नाईट लँडिंगसाठी अडथळा ठरणारी उजळाईवाडी येथील कमान आज काढण्यात आली. यामुळे दुपारी बारा वाजल्यापासून महामार्गावर कोंडी झालेली आहे. 

महामार्गावर गोकुळ शिरगावपासून सरनोबतवाडीपर्यंत सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. ही कमान हटविताना महामार्गावरील एका बाजूची वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळविण्यात आली होती. एकाच बाजूने वाहतूक सुरू झाल्याने महामार्गावर प्रचंड कोंडी झाली आहे.

विमानतळ प्राधिकरणाच्या सूचनेनुसार नाईट लँंडिगसाठी अडथळा ठरणार्‍या इमारती, मंदिरांची शिखरे, विद्युत खांब, व कमानी  हटविण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने उजळाईवाडी उड्डाणपुला जवळील पुणे दिशेने जाणाऱ्या महामार्गावरील मोठी कमान हटवण्याचे काम सुरू झाले. यावेळी बंगळूरहून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक जाजल पेट्रोल पंपा जवळ बंगळूरकडे जाणाऱ्या मार्गावर वळविण्यात आली होती. सुरुवातीस प्रचंड वाहतूक कोंडी झाली. परंतु त्यानंतर उजळाईवाडी तलावाजवळील दुभाजक फोडून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक पुन्हा त्याच मार्गावरती मार्गस्थ केल्यामुळे वाहतूक मंद गतीने सुरू झाली.

दरम्यान या कमानीचे काम मजबूत, अचूक असल्यामुळे कमान हटविण्यासाठी अपेक्षेपेक्षा पाच तास उशीर लागला. अकरा वाजता सुरू झालेले काम साडेचार वाजेपर्यंत सुरू होते. यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अभियंता बशीर भाई हायवे महामार्ग पोलीस दलाचे जगन्नाथ जानकर महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे व महामार्ग पोलीस दलातील पोलिस व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Marathi News Esakal
www.esakal.com