मोठी बातमी! पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक बंद होणार; 'या' पर्यायी मार्गाने वळवणार वाहतूक

वाहतूक पोलिसांकडून पाहणी करून सेवा रस्ते पूर्ण होऊन सुरू होत नाहीत, तोपर्यंत पर्यायी मार्गाने वाहतूक वळवू नये.
Pune-Bangalore National Highway
Pune-Bangalore National Highwayesakal
Summary

महामार्गावरील (Pune-Bangalore National Highway) सहा पदरीकरणांतर्गत उचगाव व सरनोबतवाडी येथील भुयारी मार्गाच्या रुंदीकरणासाठी वाहतूक बंद करावी लागणार आहे.

कोल्हापूर : पुणे-बंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Bangalore National Highway) सहा पदरीकरणांतर्गत उचगाव व सरनोबतवाडी येथील भुयारी मार्गाच्या रुंदीकरणासाठी वाहतूक बंद करावी लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणांहून शहरात ये-जा करण्यासाठी या भुयारी मार्गावरील वाहतूक विविध पर्यायी मार्गांनी वळवण्याचा प्रस्ताव ठेकेदार कंपनीने पोलिस अधीक्षकांकडे दिला आहे.

पण, वाहतूक पोलिसांकडून पाहणी करून सेवा रस्ते पूर्ण होऊन सुरू होत नाहीत, तोपर्यंत पर्यायी मार्गाने वाहतूक वळवू नये, असा अभिप्राय दिला आहे. कागल (Kagal) ते पेठनाका भागाचे काम करणाऱ्या रोडवे सोल्युशन इंडिया इन्‍फ्रा लि.च्या प्रकल्प व्यवस्थापकांनी पर्यायी मार्गाच्या प्रस्तावाला परवानगी मिळावी म्हणून मागणी केली आहे.

Pune-Bangalore National Highway
मुंबई-गोवा महामार्ग बनला मृत्यूचा सापळा! कोकणपट्ट्यात 380 जीवघेणे अपघात; 132 जणांचा बळी

लक्ष्मी टेकडी, अंबाबाई मंदिर ते रेमंड चौक, फाईव्ह स्टार एमआयडीसीमार्गे (MIDC) गडमुडशिंगी, सांगवडे, हुपरी, रेंदाळला जाणाऱ्या वाहनांसाठी पुढील पर्यायी मार्ग निवडले आहेत. त्यात हुपरी-पट्टणकोडोली मार्गे कोल्हापूर शहरात जाणारी वाहने कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी, गोकुळ शिरगाव एमआयडीसीतून (Gokul Shirgaon MIDC) बेंगळुरू-पुणे महामार्गावरून जातील.

Pune-Bangalore National Highway
वरपेंना मारहाण करणाऱ्या राजेश क्षीरसागरांवर कडक कारवाई करा; दानवेंचा पोलिस अधीक्षकांनाच इशारा
Pune-Bangalore National Highway GR
Pune-Bangalore National Highway GR

सांगवडे फाट्याकडून शहरात जाणारी वाहने हुपरी-कोल्हापूर रोड व गोकुळ शिरगाव एमआयडीसी बेंगळुरू-पुणे मार्गे वळविण्यात येणार आहेत. तर गडमुडशिंगी ते उचगाव मार्गे जाणारी वाहने गांधीनगर, तावडे हॉटेल, उजळाईवाडी, केआयटी कॉलेज भुयारी मार्गे वळवली जाणार आहेत. कोल्हापूर शहरातील टेंबलाईवाडी ते गडमुडशिंगी, हुपरी-पट्टणकोडोलीकडे जाणारी वाहने गांधीनगर-तावडे हॉटेल व उजळाईवाडी, केआयटी कॉलेज भुयारी मार्गे वळविण्याचे ठरवले आहे.

Pune-Bangalore National Highway
Sindhudurg Politics : राज ठाकरेंना मोठा धक्का; 'हा' माजी आमदार मनसेतून बाहेर, राजकारणात उडाली खळबळ

दरम्यान, महामार्गाच्या सध्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आहे. सेवा रस्ते जोपर्यंत पूर्ण होऊन वाहतुकीसाठी सुरू होत नाही. तोपर्यंत अशी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवू नये, असा अभिप्राय दिला असल्याचे उजळाईवाडी येथील राष्ट्रीय महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com