मिरज - शहरातील किल्लाभाग परिसरात सुरु असलेल्या सदनिकेच्या तळमजल्याच्या कामावेळी तटभिंतीचे बांधकाम कोसळून बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेत अन्य सहा कामगारही जखमी झाले आहेत. भिमाप्पा सिध्दाप्पा मेटलकी (वय-४५, रा. ब्याकेरी ता. रायबाग) असे मृत मजूराचे नाव आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.