

गिरनारला देवदर्शनासाठी जात असताना बडोद्यात सांगलीच्या दोघांचा जागीच मृत्यू
esakal
Traveling to Girnar Accident : गुजरातमधील गिरनार येथे देव दर्शनासाठी जात असताना बडोदा येथे झालेल्या मोटार अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाल्याची घटना घडली आहे. राहुल गुंडा माने (वय ३७, मूळ रा. विठ्ठलनगर जत, सध्या रा. पुणे) व सागर बाबूराव मदने (३६, मूळ रा. कंटी, सध्या रा. पुणे) अशी मृत तरुणांची नावे असून, या घटनेत संग्राम शाहू भोसले (३७, मूळ रा. जत, सध्या पुणे) व आणखी एकजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तेथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.