
जत: खैराव (ता. जत) येथे महिला रानात शेळ्या चारण्यासाठी गेली असता तिचा विहिरीत पाय घसरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. अंकिता संतोष करांडे (वय २७, खैराव, ता. जत) असे मृत महिलेचे नाव असून शनिवारी (ता. ३०) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. मात्र, सात तासांच्या शोधकार्यानंतर तिचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.