

चारचाकी विहिरीत कोसळून तरुणाचा मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना
esakal
Sangli Car Accident : चारचाकी गाडी शिकत असताना अनियंत्रित होऊन विहिरीत कोसळल्याने एक तरुण युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शिंदेवाडी (ता. मिरज) येथील गावात आज सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत मृतदेह विहिरीबाहेर काढण्याचे काम सुरू होते. स्वप्नील निवास कामिरे (वय २०, शिंदेवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे कामिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.