घर सांभाळण्यासाठी प्रेमचा विवाह नात्यातील कावेरीसोबत करण्याचे ठरले. चार महिन्यांपूर्वी सोहळा झाला. कष्ट झेलत, संघर्ष करत, सासूची सेवा करत ती संसाराची स्वप्ने पाहत होती.
सांगली/तासगाव : चार महिन्यांपूर्वीच तिचं लग्न (Marriage) झालं होतं. अपघातात जखमी झालेल्या सासूची सेवा करत करत ती संसारात रमली होती. मात्र, आधीच संकटांनी घेरलेल्या कुटुंबावर आज काळाने आणखी एक घाला घातला. दमूनभागून दुपारी झोपलेल्या या नवविवाहितेला नागाने दंश (Snakebite) केला आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.