

Family Loses Livelihood After Horse Dies Due to Fallen Electricity Wire
sakal
आटपाडी: लग्नसोहळ्यांत नवरदेवाचा थाट वाढवणारा, टापांच्या आवाजाने गावोगावी आनंद पसरवणारा उमदा 'रायफल्या' विजेच्या तीव्र धक्क्याने जागीच कोसळला आणि त्याच्यासोबत एका गरीब कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचाही आधार हिरावला गेला. या हृदयद्रावक घटनेने आटपाडी परिसर हळहळला.