
पलूस : सांडगेवाडी येथे विजापूर-गुहागर महामार्गावर रविवारी पहाटे भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्याने ट्रकमधील क्लीनर अवधूत विनायक सदामते (देशिंग, ता. कवठेमहांकाळ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पलूस पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.