We Care नक्की पहा Video : हात स्वच्छ धुण्याचे सात प्रकार

We Care नक्की पहा Video : हात स्वच्छ धुण्याचे सात प्रकार

सातारा : कोरोना संसर्गचे रुग्ण पुण्याबरोबर दुसऱ्या जिल्ह्यातही आढळले आहेत. त्यामुळे साताऱ्यात दक्षता पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गबाधित रुग्ण आढळल्यास त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करावे. बाधित रुग्ण राहणाऱ्या ठिकाणापासून तीन किलोमीटर परिसरात प्रत्येक घराचा सर्व्हे करा. ग्रामीण भागात 50 घरांसाठी व शहरी भागातील 100 घरांसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी, पालिकांचे मुख्याधिकारी यांनी सूक्ष्म आराखडा तयार करावा, अशा सूचना आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.
 
धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृहात आज जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत कोरोना संसर्गविषयी माहिती व उपाययोजनांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये, कॉलेजच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड उपस्थित होते.
 
शासकीय विभागप्रमुखांनी आपल्या कार्यालयाचा परिसर व कार्यालयातील शौचालयाची स्वच्छता करून घ्यावी, असे सांगून शेखर सिंह म्हणाले,""प्रत्येकाने आपल्या स्वच्छतेची काळजी स्वत:च घेतली पाहिजे. आज तरी कोरोना संसर्गावर कुठलाही उपचार नाही. पण, स्वच्छतेच्या जोरावर या संसर्गापासून दूर राहता येईल. विभागप्रमुखांनी आपल्या कार्यालयात हात स्वच्छ धुण्याचे सात प्रकार प्रत्येक कर्मचाऱ्याला सांगणे गरजेचे आहे, यासाठी प्रत्येक कार्यालयात आज (सोमवारी) याची प्रात्यक्षिके घ्यावीत. शासकीय कार्यालयांत येणाऱ्या नागरिकांना शेकहॅंड टाळून नमस्ते करण्याची सवय लावा. बाहेरील देशातून नागरिक प्रवास करून आला तर त्याची माहिती तत्काळ पोलिस, महसूल व आरोग्य विभागाला द्यावी. धार्मिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा यातील गर्दी टाळण्यासाठी देवस्थानचे पुजारी किंवा मानकरी यांनी विधिवत पूजा करावी. महामार्गालगत राज्याबाहेरील किंवा देशाबाहेरील येणारे प्रवासी यांची लॉजमध्ये नोंदणी रजिस्टरमध्ये नोंदणी करावी. कोरोनाबाबत अनेक अफवा पसरत आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नये.''
 
संजय भागवत म्हणाले,"" कोरोनाचा एकदा संसर्ग रुग्ण आढळल्यास तो राहणाऱ्या आसपासच्या घरांचा सर्व्हे करण्यासाठी पथक तयार केले आहे. पथकाकडून प्रत्येक घराचा सर्व्हे करून काही ठराविक प्रश्न विचारण्यात येणार आहेत. कुणी आजारी नागरिक आढळल्यास त्याची माहिती हे पथक तत्काळ आरोग्य विभागाला देईल.''
 
तेजस्वी सातपुते म्हणाल्या,"" कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कामाच्या मर्यादा पाळू नका, आपल्या कामाचे विस्तारीकरण करा. एकदा जर संशयित रुग्ण आढळल्यास त्याला प्राथमिक सुविधा द्या. कोरोना संसर्गाबाबत अफवा पसरविणे हा अपराध आहे. कुणी अफवा पसरवित असल्यास त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई केली जाईल.''
 
विभागप्रमुखांनी कार्यालयातील शौचालय तसेच वारंवार स्पर्श होणाऱ्या वस्तू स्वच्छ ठेवाव्यात. कोरोना संसर्ग ही आपत्ती असून, या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून काम करू, असे त्यांनी सांगितले. या वेळी डॉ. सुभाष औंधकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे कोरोना संसर्ग व करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली.

महाबळेश्वरात पर्यटक येण्यावर कोणताही प्रतिबंध नाही ; मात्र...

कुडाळ : कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रतिकार करण्यासाठी कुडाळ ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतींने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे, आज कुडाळ येथील मुख्य बाजारपेठेत कोरोना संबंधि जनजागृती करताना स्वच्छ हाथ कशा प्रकारे धुवून आरोग्याची काळजी घेतली पाहिजेत याबाबतचे सविस्तर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तसेच कोरोना संबंधि कोणती काळजी घेणे आवश्यक आहे हे समजून सांगण्यात आले, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करून योग्य ती काळजी घेण्यात यावी असेही सांगण्यात आले. तसेच गर्दी टाळण्यासाठी खबरदारी म्हणून गावाचा आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार असून गावात कोणतेही कार्यक्रम, कार्य होणार नाहीत असेही जाहीर करण्यात आले.

यावेळी जनजागृतीसाठी माहितीपत्रके वाटण्यात आली. कार्यक्रमास सरपंच विरेंद्र शिंदे, प्रतापगड कारखान्याचे संचालक मालोजीराव शिंदे, प्राथमिक आरोग्य  केंद्र अधिकारी डॉ. अनंत वेलकर, आरोग्य सहायक शांताराम झाडे, आरोग्य सेवक सुभाष फरांदे, सोमनाथ पंढरपोटे, श्रीधर कांबळे यांच्यासह मनोज वंजारी, अविनाश गोंधळी, अंगणवाडी सेविका, आरोग्य केंद्रातील कर्मचारी ,ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com