
बेळगाव : नवीन ट्रॅकवरून धावताहेत रेल्वे
बेळगाव - बेळगाव ते देसूर (१०.८७ किमी) दरम्यान रेल्वे दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या ट्रॅकची चार दिवसांपूर्वी स्पेशल ट्रेनद्वारे ट्रायल (चाचणी) घेण्यात आली. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या नव्या ट्रॅकवरून रेल्वे धावत आहेत. देसूर ते लोंढा दरम्यानच्या ट्रॅकचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम देखील लवकरच पुर्ण होणार आहे. मिरज ते लोंढा पर्यंतचे दुपदरीकरणाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. मार्च २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व आसपास दुपदरीकरणाची कामेही प्रगतिपथावर आहेत. पहिल्या टप्यात बेळगाव रेल्वे स्टेशन ते तिसऱ्या गेटपर्यंत काम पूर्ण करून या नव्या ट्रॅकवरून रेल्वे धावली होती. मात्र, आता बेळगाव ते देसूर या १० किलोमीटरच्या नव्या मार्गावरून रेल्वे धावत आहे. यामुळे देसूर ते लोंढा पर्यंतचे कामालाही गती दिली आहे. यामुळे बेळगावचा विकास होण्यास मदत होणार आहे.
चार दिवसांपूर्वी बेळगाव ते देसूर या मार्गाची नैर्ऋत्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त अभय कुमार राय यांनी स्पेशल ट्रेनद्वारे स्पीड ट्रायल (चाचणी) घेतली होती. ताशी १२० किलोमीटर वेगाने नव्याने तयार करण्यात आलेल्या दुपदरी रेल्वेमार्गावरून ही चाचणी घेण्यात आली. त्यानंतर ट्रॅक रेल्वे धावण्यास व्यवस्थित असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतरच त्यावरून रेल्वे धावली.
बेळगाव ते देसूर दरम्यानचे नव्या ट्रॅकची काम पूर्ण झाले आहे. यामुळे बुधवारी याची पाहणी करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून यावरून रेल्वे धावत आहेत. देसूर ते लोंढा पर्यंतचे काम देखील प्रगतीपथावर आहे.
- अनिश हेगडे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, नैर्ऋत्य रेल्वे.
Web Title: Trains Runing On New Tracks
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..