सांगलीत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

प्रकाश निंबाळकर
शनिवार, 30 जून 2018

सांगली : जिल्ह्यातील अकरा पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. आष्टा पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांना लाच घेताना अटक केल्यानंतर रात्री बदल्यांचे आदेश निघाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली.

सांगली : जिल्ह्यातील अकरा पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. आष्टा पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांना लाच घेताना अटक केल्यानंतर रात्री बदल्यांचे आदेश निघाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली.

जिल्हा पोलिस प्रमुख सुहेल शर्मा यांनी आष्टा आणि इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांचीही बदली केली. अधिक्षक सुहेल शर्मा यांनी केलेल्या बदल्यांमध्ये पोलिस नियंत्रण कक्षाकडील आठ अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांकडे नियुक्ती देण्यात आली आहे. तर आष्टा येथील पोलिस निरीक्षक एम. बी. पाटील यांनानियंत्रण कक्षाकडे नियुक्त केले आहे. बदल्या करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. इस्लामपूरचे पोलिस निरीक्षक एस. आर. कोळेकर यांची मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याकडे बदली करण्यात आली आहे. तर नियंत्रण कक्षाकडील पोलिस निरीक्षक विश्‍वास साळोखे यांची इस्लामपूरला नियुक्ती केली आहे. तसेच नियंत्रण कक्षाकडील निरीक्षक एस. ए. जमादार यांना आष्टा पोलिस ठाण्याकडे नियुक्त केले आहे. या सर्व प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या आहेत.

नियंक्षण कक्षाकडील बदली आलेले अधिकारी असे (बदलीचे ठिकाण) : पोलिस निरीक्षक विश्‍वास साळोखे (इस्लामपूर) 
पोलिस निरीक्षक एस. ए. जमादार (आष्टा)
सहायक निरीक्षक के. व्ही. पाटील (संजयनगर)
महिला सहायक पोलिस निरीक्षक व्ही. बी. जाधव (ए. एच. टी. यु. कक्ष)
महिला सहायक पोलिस निरीक्षक एम. एस. काळगावे (इस्लामपूर)
सहायक निरीक्षक जी. एम. देशमुख (मिरज शहर)
पोलिस उपनिरीक्षक आर. के. कसबेकर (एम.आय.डी.सी. कुपवाड)
महिला पोलिस उपनिरीक्षक ए. व्ही. पाटील (आष्टा). इतर बदली केलेले अधिकारी पोलिस निरीक्षक एस. आर. कोळेकर, इस्लामपूर (मिरज ग्रामीण)
 पोलिस निरीक्षक एम. बी. पाटील, आष्टा (नियंत्रण कक्ष)
सहायक निरीक्षक एम. पी. सोनवलकर, चिंचणी वांगी (विश्रामबाग)

Web Title: transfer of sangli police officers