
प्रगीता सध्या कोल्हापुरात स्थायिक आहेत. केवळ आई-वडिलांची सेवा करण्यासाठी त्यांनी अमेरिका सोडून कोल्हापूर गाठले आहे. कोल्हापूरची ओळख अनोख्या पद्धतीने देश-विदेशात पोचविण्याची त्यांची धडपड सुरू आहे.
कोल्हापूर - तब्बल ४० देश फिरून पुन्हा कोल्हापुरात आलेल्या प्रगीता पहवा यांची कोल्हापूरची ओळख अनोख्या पद्धतीने देश-विदेशात पोचविण्याची धडपड सुरू आहे. स्वतः ‘लोकल टू ग्लोबल’ असलेल्या प्रगीता यांना कोल्हापुरातील महिला-युवकांना रोजगार द्यायचा आहे. त्यांनी तयार केलेले उत्पादन जगभरात पोचवायचे आहे. यासाठी त्यांचा ३० वर्षांचा देश-विदेशातील अनुभव त्या ग्रामीण भागातील महिला-युवकांत शेअर करीत आहेत.
प्रगीता सध्या कोल्हापुरात स्थायिक आहेत. केवळ आई-वडिलांची सेवा करण्यासाठी त्यांनी अमेरिका सोडून कोल्हापूर गाठले आहे. हिंदी-इंग्रजीमधून त्यांचे संभाषण होते. तरीही त्या मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मराठी वाचता येते. त्यांचे वडील म्हणजे अण्णासाहेब यशवंतराव पवार अर्थात ए.वाय.पवार. ते येथील १०९ टी.ए. बटालियनमधून मेजर पदावरून निवृत्त झाले आहेत. ते मूळचे गोरखा बटालियनमधील. ते आणि त्यांची पत्नी कोल्हापूरची ओळख नेणार ४० देशातशीला कोल्हापुरात राहतात. त्यांना पाच आपत्य. त्यापैकी प्रगीता पाच वर्षे कोल्हापुरात स्थायिक आहेत. त्यांची इतर भावंड अमेरिकेत आहेत.
पाहा - PHOTOS : सुंदर असं घर, ते ही फक्त लाकडाचं !
कोल्हापूरबद्दल आपण काही तरी केले पाहिजे ही प्रगीता यांची धडपड सुरूच होती. रोटरीच्या माध्यमातून त्यांनी शेळकेवाडी (ता.करवीर) येथे शाळेसाठी काम ही केले आहे. महापुरात कोल्हापूरकर मदतीसाठी कसे धावून आले, हे त्यांनी पाहिले. आणि त्यांनी कोल्हापूरला ‘लोकल टू ग्लोबल’ बनविण्याचा ध्यास घेतला आहे. प्रगीता सामव्हरा कन्सलटंन्सी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालक आहेत. त्यांनी तब्बल ४० देशांत भारतातील वेगवेगळ्या वस्तूंना परदेशात बाजारपेठ मिळवून दिली. ग्रामीण भागात तयार होणाऱ्या वस्तूंना थेट परदेशात स्थान देण्याचे काम त्यांनी काही वर्षांत केले आहे.
पाहा - काय सांगता ! दहा ग्रॅमचे फोल्डिंगचे कोल्हापुरी चप्पल...
या वस्तूनां मागणी नागालॅण्डमधून बॅगची मागणी आहे. जलपर्णीपासून (शेवाळ) बॅग तयार होतात.
दोरीपासून तयार केलेल्या आकाश दिव्याला परदेशात मागणी आहे. सध्या मणेरमळ्यातील महिला या तयार करीत आहेत.इचलकरंजीतील टाकाऊ दोऱ्यांपासून तयार केलेला जमखाना खराब कागदांपासून केलेल्या वस्तू सीड (बी) यांच्यापासून तयार केलेला कागद, कागद फेकून दिल्यास तेथे रोप उगवेल असा त्याचा वापर होईल.
दिल्लीतून देशातील वस्तू अनेक देशांत पाठविल्या आहेत. आजही तो संपर्क आहे. आता ही मागणी कोल्हापुरातून पूर्ण करू शकते. ग्रामीण महिला-युवकांतून अशी मागणी पूर्ण झाल्यास त्यांना हक्काची परदेशातील बाजारपेठ मिळेल. महिला-युवकांना रोजगार मिळेल. यातून देशाची सेवा होईल. ‘लोकल टू ग्लोबल’ असे मार्केट तयार होईल.
- प्रगीता पहवा