esakal | इस्लामपुरातील प्रकाश हॉस्पीटलमध्ये होणार कोरोना रूग्णांवर उपचार 
sakal

बोलून बातमी शोधा

Treatment of corona patients at Prakash Hospital in Islampur

इस्लामपूर : येथील प्रकाश शिक्षण मंडळाच्या प्रकाश हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटरची जिल्हा प्रशासन स्तरावर कोविड 19 हॉस्पिटल म्हणुन निवड करण्यात आली आहे.

इस्लामपुरातील प्रकाश हॉस्पीटलमध्ये होणार कोरोना रूग्णांवर उपचार 

sakal_logo
By
शांताराम पाटील

इस्लामपूर : येथील प्रकाश शिक्षण मंडळाच्या प्रकाश हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटरची जिल्हा प्रशासन स्तरावर कोविड 19 हॉस्पिटल म्हणुन निवड करण्यात आली आहे. या हॉस्पिटल मधील वैद्यकीय तज्ञ व त्यांचा स्टाफ आता कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार करणार आहेत. सोमवारी (ता.3) या सेंटरचे उद्‌घाटन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दुपारी 1 वाजता होणार आहे. आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट देऊन पाहणी केली. 

याबाबत प्रकाश हॉस्पिटलचे संस्थापक, नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, "" सांगली जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या व अपुरी पडणारी वैद्यकीय सेवा लक्षात घेता प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी नव्या कोविड लॅबोरेटरी व कोविड उपचार सेंटरची निर्मिती होणे आवश्‍यक आहे. याच दृष्टीने सांगली जिल्ह्यात पहिले कोविड लॅबोरेटरी व कोविड उपचार सेंटर सुरू करण्याचा निर्णय प्रकाश हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटरच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. याला जिल्हाधिकारी अभिजीत चैधरी, जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळुंखे यांनी मान्यता दिली आहे. 

प्रकाश हॉस्पिटल मधील दर्जेदार सोयी सुविधा, तज्ञ वैद्यकीय स्टाफ यांनी रूग्णांच्या सेवेच्या माध्यमातुन विश्वासाहर्ता जपली आहे. हे हॉस्पिटल कोरोनाग्रस्त रूग्णांना मोठे आधार ठरणार असून लोकप्रतिनिधी, प्रशासन व जिल्हा वैद्यकीय व्यवस्थापनावरील ताण कमी होणार आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील कृष्णा हॉस्पिटल नंतर प्रकाश हॉस्पिटल हे दुसरे कोविड उपचार सेंटर आहे. कोरोना ग्रस्त रूग्णांच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये तज्ञ वैद्यकीय डॉक्‍टर्स, तज्ञ नर्सिंग स्टाफ, कोरोनाग्रस्त रूग्णांच्या उपचारासाठी 105 बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे." यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळुंखे, प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसिलदार रविंद्र सबनीस, मुख्याधिकारी प्रज्ञा पवार, गटविकास आधिकारी शशीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. 


संपादन : प्रफुल्ल सुतार