esakal | महाबळेश्‍वर : एलीफिस्टनच्या दरीतून ट्रेकर्सने शाेधले लाखाे रुपये

बोलून बातमी शोधा

Mahableshwar Top Breaking News In Marathi

बेळगावहून आलेल्या शालेय सहलीतील एका शिक्षिकेची पर्स माकडांनी पळविली. त्यामध्ये लाखाे रुपये हाेते. ती पर्स खाेल दरीत हाेती. ट्रेकर्सने पैसे शाेधल्यामुळे सर्वजण आनंदित झाले. 

महाबळेश्‍वर : एलीफिस्टनच्या दरीतून ट्रेकर्सने शाेधले लाखाे रुपये
sakal_logo
By
रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या सहलीतील शिक्षीकेच्या हातातील एक लाख रुपये रक्कम असणारी पर्स माकडाने हिसकावून नेल्याने एकच गोंधळ उडाला. मात्र, श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील ट्रेकर्सच्या जवानांनी खोल दरीतून ही पर्स मिळवून दिल्याने जीव भांड्यात पडला.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
 
बेळगाव येथील गजानन भातखंडे हायस्कुलची सहल महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आली हाती. क्षेत्र महाबळेश्वर येथे सहल आली होती. ऑर्थरसिट पॉईंट पाहिल्यावर सहल एलीफिस्टन पॉईंट येथे आली . या ठिकाणी सर्वजण पर्यटनाचा आनंद घेताना अचानक एका शिक्षिकेच्या हातात असणारी पर्स माकडाने पळवून नेली. शिक्षिका घाबरल्या आणि मोठी रक्कम पर्समध्ये असल्याने त्या मटकन खाली बसल्या. माकडाला हाकलण्याचा प्रयत्न विद्यार्थी व इतर शिक्षकांनी केला. पण, तोपर्यंत पर्स घेऊन माकड झाडावरून खोल दरीत गायब झाले. सर्वांची धावपळ सुरू झाली पण, काहीच उपयोग झाला नाही.

सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत ? 

पर्समध्ये विद्यार्थ्यांचे सहलीचे एक लाख रुपये असल्याने शिक्षिका रडायला लागल्या. शेजारील व्यावसायिक आनंद पवार यांना ही माहिती माहिती सहकारी शिक्षकांनी दिली. पवार यांनी श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील ट्रेकर्स जयवंत बिरामणे व अनिल लांगी यांना माहिती दिली. ते दोघेही घटनेच्या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता हजर झाले. ट्रेकर्स 80 ते 100 फुट दरीत उतरले. खाली पोचल्यावर त्यांना 500 रुपयांच्या नोटांचा एक बंडल व 100 रुपयांचा नोटांचा एक बंडल असे सापडले.

अवश्य वाचा  #MondayMotivation एकीचे बळ 


त्यानंतर अंधार पडल्याने दुसरे दिवशी सकाळी हे ट्रेकर्स पुन्हा दरीत उतरले. अगदी खोल दरीत गेल्यावर त्यांना दोन हाजार रुपयांच्या नोटांचा बंडल सापडला . नंतर आनंद वन भुवन येथे सहल विसावली होती. तेथील मिलिंद भटकांडे या शिक्षकांना संपर्क करून हे एक लाख रुपये बिरामने व लांगी यांनी ताब्यात दिले. त्यामुळे सर्वानीच मुलांचे पैसे सापडल्याने सुटकेचा निश्वास सोडला. शाळेच्या शिक्षकांनी धाडसी ट्रेकर्सचे आभार व्यक्त केले. क्षेत्र महाबळेश्वर ग्रामस्थांकडूनही बिरामने व लांगी यांचे कौतुक होत आहे.