
सांगली : अलकुडजवळ तिहेरी अपघात
शिरढोण - रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अलकुड (एम) (ता. कवठेमहांकाळ) येथील गावानजीक पुलावर तिहेरी झालेल्या अपघातात चारचाकी वाहनांमधील एकजण जागीच ठार तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. गजानन रामचंद्र सपकाळ रा. अलकुड (एम) जागीच ठार झालेल्यांचे नाव आहे. हा अपघात शनिवार दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडला असून याची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत झाली आहे. याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी की गजानन सपकाळ हे चारचाकी क्रमांक एम. एच.०९ डी. एक्स.(१०२२) शिरढोणहुन मिरजकडे निघाले होते. दरम्यान अलकुड एम (ता. कवठेमहांकाळ) येथील पुलावर आले असता सपकाळ यांच्या गाडीचा पुढील टायर फुटल्याने स्टेरिंगवरील ताबा सुटल्याने दुभाजक वरून मिरजहून कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे व त्यांच्या पत्नी चारचाकी क्रमांक (एम.एच.१३ डी. टी.४०४४) मधून कवठेमहांकाळकडे येत होते. यावेळी त्यांच्या वाहनावर जाऊन आदळली याच दरम्यान मिरजहून नागजकडे जात असलेली मोटारसायकल क्र. (एम.एच. १० डी. एच. ५१६७) ही अपघात झालेल्या वाहनावर पाठीमागून जाऊन आदळली. यात झालेल्या तिहेरी अपघातात अलकुड (एम) येथील गजानन रामचंद्र सपकाळ हे जागीच ठार झाले.
तर चार चाकी वाहनांमधील असलेले दीपक जनगोंडा ढब्बू, श्रीकांत पंडित पाटील, परवीन पाटील सर्व रा.अलकुड (एम) ता. कवठेमहांकाळ व कवठे महांकाळ येथील पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे त्यांच्या पत्नी तसेच मोटारसायकलवरील शाहीन मुल्ला, सना मुल्ला हे दोघे रा. (नागज) असे सात जण जखमी झाले. या जखमींना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान घडला. असून यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत झाली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे करीत आहेत.