
Maharashtra Latest update: श्री तुळजाभवानी मंदिरातील काही भागांचे जतन आणि संवर्धन पुरातत्त्व व संग्रहालये विभागाच्या मार्गदर्शनात करण्यात येणार आहे. मंदिरासह परिसरात ५८ कोटी रुपयांची विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे मंदिरासह परिसराला गतवैभव प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी पुजारी मंडळ आणि नागरिकांच्या आढावा बैठकीत दिली.
बैठकीत महंत तुकोजी बुवा, पाळीकरी पुजारी मंडळाचे अध्यक्ष बिपिन शिंदे, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष आनंदराव कोंडा, तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक माया माने, तहसीलदार अरविंद बोळंगे, धार्मिक सहायक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, अभियंता राजकुमार भोसले, प्रवीण अमृतराव, जयसिंग पाटील, विश्वास कदम आदी उपस्थित होते.